साप बाजूने जरी सरपटत गेला बोबडी वळते. भीतीने ती वाट सोडून आपण दुसरीकडून जाणं पसंत करतो. मात्र काही लोक सापाला जराही घाबरत नाहीत. सापाजवळ जातात किंवा त्याला हाताने पकडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ थायलंडमधील आहे. व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती सापाला पकडताना दिसत आहे. या दरम्यान साप त्याला चावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र साप पकडणारा व्यक्ती यापासून स्वत:चा बचाव करत आहे.

समाचार वेबसाइट थाइगरच्या मते, दक्षिण थायलंडमधील क्राबीमध्ये स्थानिक लोकांनी १४ लांब किंग कोब्रा ताडाच्या शेतीत घुसताना पाहिला. याबाबत त्यांनी प्रशासनाला माहिती दिली. साप एका सेप्टिक टँकमध्ये लपण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर तात्काळ काही कर्मचारी सर्पमित्रासोबत तिथे पोहोचले. एओ नांग सबडिस्ट्रिक्ट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह संघटनेचा कार्यकर्ता सुती नवादने २० मिनिटं शर्थीचे प्रयत्न करून साप पकडला. ४० वर्षीय नवादने सापाला पहिल्यांदा मोकळ्या रस्त्यावर कसंबसं आणलं. त्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. शर्थीचे प्रयत्न करून अखेर सापाला पकडण्यात यश आलं.

After Virat Kohli Fight why Gautam Gambhir fiercely argue With Umpire
विराट कोहलीचा वाद संपेपर्यंत गौतम गंभीर भडकला; श्रेयसने इशारा करताच पंचांशी भिडला, पण झालं काय? पाहा Video
IPL 2024 Shivam Dube Wife Anjum Khan Share Emotional Post for MS Dhoni on Instagram
IPL 2024: ‘सॉरी’ म्हणत शिवम दुबेच्या पत्नीची धोनीसाठी लांबलचक पोस्ट; अंजुम खान म्हणाली, “माझ्या तोंडून एकही शब्द..”
woman dancing after on climbing a tree funny reels
“अहो ताई, जरा सांभाळून….”, झाडावर चढून नाचतेय ही तरुणी, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू
haryana roadways driver was see smoking hookah while driving the bus video viral
VIDEO: प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एका हातात स्टेअरिंग अन् दुसऱ्या हाताने हुक्का ओढत चालक चालवतोय बस

किंग कोब्रा सापाची लांबी १४ फूट असून वजन १० किलो आहे. किंग कोब्राला पकडल्यानंतर एका जंगलात सोडलं आहे. किंग कोब्रा सर्वात विषारी असून दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियात आढळून येतो.