BMW Job Offer Viral News: Discover how personal branding on LinkedIn led to a luxury job offer for a teenager : कोणतीही पदवी घेतलेली नसतानाही एका १९ वर्षीय भारतीय कंटेंट क्रिएटरने बीएमडब्लू कंपनीमध्ये मार्केटिंगमध्ये नोकरी मिळवल्याचा दावा करणारी एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे लिंक्डइनवर सध्या मोठी चर्चा रंगली असून या विषयाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या पोस्टनुसार, गौरी एम. या तरुणीला कथितपणे अशी नोकरी मिळाली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ऑनलाईन व्हिजीबिलीटी आणि पर्नल ब्रँडिंग याचा कशाप्रकारे भरती प्रक्रियेवर प्रभाव पडू शकतो याचे एक उदाहरण म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.

लिंक्डइनवरील करण्यात आलेल्या पोस्टनुसार, तिने कोणताही पारंपारिक शैक्षणिक किंवा कॉर्पोरेट मार्ग स्वीकारला नाही, तर त्याऐवजी स्वतःची एक भक्कम अशी डिजिटल ओळख निर्माण केली, आणि त्यानेच तिच्या पोर्टफोलिओ म्हणून काम केले.

पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्याने सांगितले की, गौरीचे लिंक्डइनवर ६५ हजारांहून अधिक तर इन्स्टाग्रामवर ३५ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, ज्यावर ती सातत्याने कंटेट पोस्ट करत असते. व्हायरल होत असलेल्या दाव्यांनुसार, संबंधित नोकरीसाठी साधारणपणे पाच वर्षांच्या अनुभवाची अट असूनही, गौरीच्या या मजबूत ऑनलाइन प्रझेंन्सने रिक्रूटर्सचे लक्ष वेधून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले की,”तिच्याकडे एक मूल्यवान गोष्ट आहे जी कोणत्याही पदवीपेक्षा किंवा दीर्घकाळ अनुभवापेक्षा जास्त मौल्यवान आहे. त्यामुळे तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी लिंक्डइन आणि इंस्टाग्राम खात्यांना एक ‘मिनी प्रोजेक्ट’प्रणाणे हाताळण्याची हीच योग्य वेळ आहे.”

गौरीने देखील ईमेलवर झालेल्या संवादाचा एक स्क्रीनशॉट शेअर करून आपल्या निवड प्रक्रियेबद्दलही सविस्तर माहिती दिली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे: “मला जगातील सर्वात मोठ्या कार समूहांपैकी एकाकडून नोकरीची ऑफर मिळाली आहे. हो, जगातीलआणि ही ऑफर फक्त कोलॅब्रेशनसाठी नाही, एका जबाबदार मार्केटिंग रोलसाठी आहे. मी फक्त १९ वर्षांची मुलगी आहे जी आपल्या संसाधनांच्या तोडीचे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अचानक ते माझ्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर एका स्पोर्ट्स ब्रँडच्या संस्थापकाने माझ्याशी संपर्क साधला… मग त्याच आठवड्यात मला तीन नोकऱ्यांच्या ऑफर्स मिळाल्या, ज्यासाठी मी अर्जही केला नव्हता. मी कोणाकडेही काम मागितले नाही किंवा एकही कोल्ड ईमेल पाठवला नाही.”

यानंतर गौरीचे अकाउंट मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे, सातत्यपूर्ण ‘कंटेंट क्रिएशन’च्या माध्यमातून प्रोफेशनल संधी मिळू शकतात, याचे उदाहरण म्हणून गौरीकडे पाहिले जात आहे.

मनीकंट्रोलशी बोलताना गौरीने तिला मिळालेल्या या संधीबद्दल सविस्तर माहिती दिली आणि तिला खरंच एका बीएमडब्लू डीलरशिप प्रतिनिधीकडून मार्केटिंगच्या नोकरीसाठी विचारणा झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, तिने पुढे सांगितले की, “मी मुलाखती किंवा पुढील चर्चा सुरू ठेवली नाही, कारण ही नोकरी माझ्या सध्याच्या वाटचालीशी जुळणारी नव्हती.”