scorecardresearch

१९ वर्षीय कैवल्य वोहरा ठरला भारतातील सर्वात तरुण श्रीमंत! तब्बल १००० कोटींच्या संपत्तीचा आहे मालक

झेप्टो या कंपनीचा संस्थापक कैवल्य वोहरा हा भारतातील सर्वात कमी वयाची व्यक्ती आहे ज्याने १००० कोटींच्या क्लबमध्ये आपली जागा तयार केली आहे.

१९ वर्षीय कैवल्य वोहरा ठरला भारतातील सर्वात तरुण श्रीमंत! तब्बल १००० कोटींच्या संपत्तीचा आहे मालक
१९ वर्षीय कैवल्य वोहरा ठरला भारतातील सर्वात तरुण श्रीमंत! (Instagram : Kaivalya Vohra)

कोणत्याही उद्योजकासाठी १००० कोटींच्या क्लबमध्ये समावेश होणं हे एक स्वप्नच असतं. मात्र एका तरुणाने वयाच्या अवघ्या १९ वर्षातच हे स्वप्न साकार करून दाखवलं आहे. झेप्टो या कंपनीचा संस्थापक कैवल्य वोहरा हा भारतातील सर्वात कमी वयाची व्यक्ती आहे ज्याने १००० कोटींच्या क्लबमध्ये आपली जागा तयार केली आहे.

कैवल्य वोहरा हा भारतातील सर्वांत कमी वयाचा उद्योजक आहे, ज्याची एकूण संपत्ती १००० कोटींच्या घरात आहे. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ नुसार कैवल्य वोहरा हा सर्वात तरुण व्यक्ती आहे जो १००० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये कैवल्य वोहराचा क्रमांक १,०३६ आहे.

कैवल्यने २०२० मध्ये त्याचा पार्टनर आदित पालिचासह झेप्टोची स्थापना केली. आदित पालिचा २० वर्षांचा असून त्यांची एकूण संपत्ती १२०० कोटी आहे. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ नुसार, आदित पालिचाची रँक संपूर्ण भारतात ९५० आहे

आत्मनिर्भर पुणेकर तरुणी श्रीमंतांच्या यादीत! एकूण संपत्ती आहे १३ हजार ३८० कोटी

कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा दोघेही स्टँडफोर्डचे विद्यार्थी होते. दोघांनीही अभ्यास सोडून व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. दोघांनी कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास केला आहे. झेप्टो सुरू करण्यापूर्वी, दोघांनी किराणाकार्ट नावाची कंपनी स्थापन केली जी ऑनलाइन किराणा सामान पुरवत असे. यानंतर त्याचे नाव बदलून झेप्टोसेकंड केले. ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या किराणा मालाची प्रत्येक वस्तू काही मिनिटांत वितरित करण्याची सेवा याद्वारे पुरवली जाते.

आज झेप्टो झोमॅटो, स्विगी आणि इन्स्टंट यासारख्या आघाडीच्या फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या पातळीवर पोहोचले आहे. झेप्टोचे मुख्यालय मुंबईत आहे आणि ते भारतातील १० महानगरांमध्ये कार्यरत आहे. झेप्टोच्या मदतीने तुम्हाला फक्त १० मिनिटांत किराणा माल मिळतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 19 year old zepto co founder kaivalya vohra became india youngest rich man he is the owner of a wealth of around 1000 crores pvp

ताज्या बातम्या