बॉक्सिंग, बॉडीबिल्डिंग किंवा स्पोर्ट्स क्षेत्रात करियर करणारे लोकं आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी अधिक मेहनत घेत असतात. जिममध्ये तासांतास व्यायाम करतात, घाम गाळतात. तेव्हा कुठे त्यांचे शरीर तंदुरुस्त राहते. पण एका वयानंतर मानवी शरीर व्यायामाशिवाय फिट राहू शकत नाही, तसेच शरीराची त्वचाही सैल होत जाते. साधारणत: वयाच्या ६०-४० व्या वर्षानंतर अनेकांच्या हाता- पायात पूर्वीसारखी ताकद राहत नाही. ताकदीचे वय फक्त ३० ते ४० वर्षांपर्यंतचं असते. पण जगात असे काही अवलिया आहे ज्यांनी वयाच्या ७० नंतरही स्वत:ला चांगलेच फिट ठेवले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ७५ वर्षीय व्यक्तीचा फिटनेस पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक ७२ वर्षांचा व्यक्ती ३०-३५ वर्षांचा असल्याप्रमाणे बॉक्सिंग करताना दिसतोय.
या ७२ वर्षीय बॉक्सरच्या हातात अद्याप इतकी ताकद आहे, ज्याने १९० किलो वजनाच्या बॉक्सरला गार केले. व्हिडिओमध्ये बघू शकता, एक सुमो पैलवानासारखा लठ्ठ बॉक्सर एका बॉडीने फिट असलेल्या बॉक्सरशी बॉक्सिंग करतोय. यात सुरुवातीला असे वाटते की, हा १९० किलोचा बॉक्सर त्या वयाने जास्त असलेल्या बॉक्सरवर भारी पडले, फक्त २-४ ठोसे मारून त्याला गार करेल. पण घडते उलटेच तो वयस्कर बॉक्सर लठ्ठ बॉक्सरला दे दणादण ठोसे मारत राहतो. यातील एक ठोसा जोरात त्याच्या चेहऱ्यावर लागतो आणि तो वेदनेने ओरडू लागतो. त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागते. यामुळे दोघांमधील बॉक्सिंग रेसमध्येच थांबते. यातून एक कमी वजनाचा व्यक्तीही लठ्ठ व्यक्तीवर कसा भारू पडू शकतो हे दिसले.
बॉक्सिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या अनोखा बॉक्सिंगचा व्हिडिओ @FightHaven या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आला आहे. अवघ्या २६ सेकंदांचा हा व्हिडिओ ७ लाख ३३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर १० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स म्हणतायत की, स्वत:च्या टेक्निक आणि अनुभवातून आपण समोरचा व्यक्ती कितीही वजनाने भारी का असेना त्याला हरवू शकतो. तर काही युजर्सनी म्हटले की, मला स्वत:चे वजन कमी करण्यासाठी अशाप्रकारच्या प्रेरणेची गरजे होती.