लग्न ही घटना प्रत्येकासाठीच खूप खास असते. आपले लग्न खास पद्धतीने व्हावे आणि ते सर्वांच्याच सदैव लक्षात राहावे अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र उत्तरप्रदेश येथे राहणाऱ्या अझीम मन्सुरी याने अतिशय विचित्र इच्छा व्यक्त केली आहे. अझीमला आपल्या लग्नाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित करायचे आहे.

२.३ फूट उंची असणाऱ्या अझीमचे लग्न नोव्हेंबर महिन्यात आहे. अझीम हवाल्याने एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “नोव्हेंबरमध्ये माझे लग्न आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लग्नाचे आमंत्रण देणार आहे. मी स्वतः दिल्लीला जाऊन लग्नाची पत्रिका देईन.”

मागील काही वर्षांपासून अझीम स्वतःसाठी वधूच्या शोधात होता. मात्र त्याची उंची कमी असल्याने त्याला मुलगी मिळण्यात अडचणी येत होत्या. यासंबंधी त्याने अनेक राजकीय नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी केल्या. २०१९ मध्ये तर त्याने वधू शोधण्यासाठी चक्क उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर अझीमला वधू शोधण्यात यश आले आहे.

वयस्कर काकूंनी गोविंदाच्या गाण्यावर केला भन्नाट डान्स; Video पाहून नेटकरी म्हणतात, “तारुण्यात तर तुम्ही…”

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२१ मध्ये अझीम आपली होणारी पत्नी बुशरा हिला पहिल्यांदा भेटला आणि एप्रिल २०२१ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. बुशराची उंची ३ फूट इतकी आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर बुशराने लग्नाचा निर्णय घेतला. अझीम आणि बुशरा ७ नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. अझीमने लग्नासाठी खास शेरवानी आणि थ्री-पीस सूट तयार केला आहे.

जीव वाचवण्यासाठी तब्बल सहा तास फ्रिजमध्ये बसून राहिला अन्…; पाहा नेमकं काय घडलं

अझीम कॉस्मेटिकचे दुकान चालवतो. कुटुंबातील सहा भावंडांमध्ये तो सर्वात लहान आहे. उंची कमी असल्यामुळे अझीमला शाळेत टोमणे ऐकावे लागले आणि अपमान सहन करावा लागला. यानंतर त्याने पाचवीला असताना शिक्षण सोडले आणि कॉस्मेटिक स्टोअरमध्ये आपल्या भावांना मदत करण्यास सुरुवात केली.