मागील ४५ वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात ६० टक्के वाढ झाली आहे. भारतातदेखील तरुणांत आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या करणार्‍यांत ४० टक्के लोक १५ ते ३० वर्षे या वयोगटातील आहेत. अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भीती, नैराश्‍य, व्यसन, प्रेमभंग या कारणांमुळे मुलं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. यामध्ये आता सोशल मीडियाची भर पडली आहे. सोशल लाईफ आणि रिअल लाईफमधला फरक हल्लीच्या तरुणाईला कळत नाही. इंटरनेटच्या झगमगत्या दुनियेकडे तरुण आकर्षित होत आहेत. मग आपल्या मनासारख्या गोष्टी नाही घडल्या की हीच तरुणाई थेट आत्महत्येचा मार्ग निवडते. असाच एक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील एका २० वर्षिय तरुणाने चक्क इन्स्टाग्रामवर सुसाईड नोट लिहीली होती.

इन्स्टाग्रामवर लिहीली सुसाईड नोट

उत्तर प्रदेशमधील चंद्रवल गावातील रहिवासी असलेल्या या २० वर्षिय तरुणाने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर फासाच्या फोटोसह ‘आज मी स्वत:ला संपवणार आहे, गुडबाय’ असा एक मेसेज म्हणजेच सुसाईड नोट लिहीली. मात्र काहीच वेळात सायबर सेलने या तरुणाला शोधून काढत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार लखनऊ मीडिया सेलने या तरुणाच्या पोस्टची माहिती
उत्तर प्रदेशमधील गोतम नगर मीडिया सेलला दिली. त्यानंतर या तरुणाचे लोकेशन ट्रेस करण्यात आले आणि त्याला ताब्यात घेत कुटुंबासह पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

हेही वाचा – खळबळजनक! दिल्लीत भर रस्त्यात महिलेला मारहाण, आधी गाडीत ढकललं अन्…

मात्र चौकशी दरम्यान असे पुढे आले आहे की, हा तरुण त्याच्या पत्नीशी सतत भांडण होत असल्यामुळे अस्वस्थ होता आणि आत्महत्येचा विचार करत होता. दरम्यान आता तरुण कुटुंबियाच्या देखरेखीखाली आहे.