अंकिता देशकर

200 Year Old Buddhist Monk Video Viral: लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले. व्हिडिओमध्ये एक वृद्ध बौद्ध भिख्खू एका लहान मुलाला आशीर्वाद देताना दिसत आहे. व्हिडिओतील भिख्खू हे २०० वर्षांहून अधिक वयाचे असल्याचा दावा केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर,सतीश डोंगरे यांनी व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि व्हिडिओ वर लिहले होते, “भगवान बुद्धांचे हे अनुयायी २०० वर्षांचे आहेत”.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

ही रील साधारण २२०० वेळा शेअर करण्यात आली व त्याला हजारो व्ह्यूज आहेत. इतर युजर्सनीही हा व्हिडिओ शेअर केला होता.

तपास:

आम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन गूगल रिव्हर्स इमेज सर्च आणि आणि यांडेक्स या दोन्हींद्वारे इमेज शोधून, रीलची तपासणी सुरू केली. अशाच अन्य दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह रील २०२२ मध्ये व्हायरल झाल्याचे आम्हाला आढळले.

आम्हाला फेसबुक वर शेअर केलेला आणखी एक व्हिडिओ सापडला आहे. व्हिडिओमधील व्यक्ती थायलंडमधील भिख्खू बुद्ध लुआंग पो या असल्याची माहिती कॅप्शनमध्ये दिली आहे.

त्यानंतर आम्ही, ‘Monk Buddha Luang Po Ya from Thailand’ असे किवर्डस वापरून गूगल वर तपास सुरु केला. buddhistdoor.net वरील एका आर्टिकल मध्ये व्हिडिओशी मिळते जुळते फोटो सापडले.

109-year-old Thai Buddhist Monk Luang Pho Yai Dies

आर्टिकल चे हेडिंग होते: १०९ वर्षीय थाई बौद्ध भिख्खू लुआंग फो याई यांचे निधन, हे आर्टिकल ८ एप्रिल, २०२२ रोजी अपलोड करण्यात आले होते. आम्हाला thetab.com वर एक वर्षापूर्वी अपलोड केलेला लेख देखील सापडला.

https://thetab.com/uk/2022/04/04/tiktok-viral-monk-died-245979

आम्हाला याबद्दल आणखी काही लेख देखील सापडले.

https://odishatv.in/news/offbeat/lively-109-year-old-buddhist-monk-plays-blesses-kid-video-will-leave-you-stunned-watch-200799

आम्हाला newsflare.com या वेबसाइटवर या बौद्ध भिख्खूबाबत तपशीलवार लेख सापडला.

https://www.newsflare.com/video/479881/109-year-old-buddhist-monk-was-sick-child-told-by-doctors-he-wouldnt-live-past-20-before-being-given-away-by-his-mother

लेखात नमूद केले आहे की, ‘आता ८९ वर्षांनंतर फ्राखरु अजूनही लढत आहे, वाट बन क्लांग मंदिरात जीवनाचा आनंद घेत आहे जिथे त्यांची नात औय औयारी, (२९), त्यांची काळजी घेते – त्यांना दररोज त्यांच्या आवडते दूध दिले जाते. काही वर्षांपूर्वी त्यांची श्रवणशक्ती कमी झाली तरीही ते छान संवाद साधतात’.

आम्ही त्याच्यात्यांच्या नातीचे नाव गूगल केले आणि तिचे TikTok खाते सापडले. TikTok वर भारतात बंदी असल्याने, ती इतर सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर आहे का ते आम्ही तपासले.

आम्हाला तिचे इन्स्टाग्रामवर खाते सापडले. बौद्ध भिख्खू लुआंग फो याई यांच्या निधनानंतरही तिने त्यांच्या आठवणीत तिनेही काही फोटो व व्हिडिओ पोस्ट केले होते.

हे ही वाचा<< “सेक्स चॅम्पियनशिपला भारताचं रुलबुक..” शारीरिक संबंधांची स्पर्धा जाहीर होताच ‘या’ ट्विट्सची चर्चा, तुम्हाला पटलं का?

निष्कर्ष: २०० वर्षीय बौद्ध भिख्खू असल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. व्हिडिओमधील भिख्खू थायलंडमधील बौद्ध भिक्षू लुआंग फो याई असून त्यांचे १०९ व्या वर्षी, २०२२ मध्ये निधन झाले.

Story img Loader