scorecardresearch

2016 EgyptAir Crash : पायलटने पेटवलेल्या सिगारेटमुळे २०१६ साली इजिप्त एअर झाले होते क्रॅश

१३४ पानांचा अधिकृत अहवाल गेल्या महिन्यात पॅरिसमधील कोर्ट ऑफ अपीलला पाठवण्यात आला होता.

EgyptAir Crash Caused
(फोटो: Twitter)

२०१६ साली इजिप्तएअरच्या विमानाचा जो अपघात झाला तेव्हा विमानातील सर्व ६६ लोकांचा मृत्यू झाला होता. हा अपघात कॉकपिटच्या आगीमुळे झाला होता जो पायलटच्या सिगारेटमुळे सुरू झाला होता असं तपासणीत आढळून आले आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार फ्लाइट MS804 च्या पायलटने कॉकपिटमध्ये सिगारेट पेटवली, ज्यामुळे इमर्जन्सी मास्कमधून ऑक्सिजन गळती होऊन ज्वलन झाले, असा निष्कर्ष फ्रेंच एव्हिएशन तज्ज्ञांनी काढला आहे. याचा १३४ पानांचा अधिकृत अहवाल गेल्या महिन्यात पॅरिसमधील कोर्ट ऑफ अपीलला पाठवण्यात आला होता.

अहवालात पुढे म्हटले आहे की इजिप्शियन पायलट कॉकपिटमध्ये नियमितपणे धूम्रपान करत होते आणि अपघाताच्या वेळी विमान कंपनीने यावर बंदी घातली नव्हती, असे द इंडिपेंडंटमधील वृत्तात म्हटले आहे. इटालियन वृत्तपत्र Corriere della Sera ने दावा केला आहे की मास्कवर मायक्रोफोनद्वारे रेकॉर्ड केलेला हिसिंगचा आवाज होता.

(हे ही वाचा: कॅन्सरशी लढा! केमोथेरपीदरम्यान हॉस्पिटलमधूनच दिली मुलाखत, तरुणाचा फोटो पाहून नेटकरी झाले प्रेरित)

काय होती घटना?

मे २०१६ मध्ये एअरबस ए३२० पॅरिसहून कैरोला जात होते. हे विमान क्रेते बेटाजवळ, पूर्व भूमध्य समुद्रात रहस्यमय परिस्थितीत कोसळले. मृतांमध्ये ४० इजिप्शियन आणि १५ फ्रेंच नागरिकांचा समावेश आहे. या विमानात दोन इराकी, दोन कॅनेडियन आणि अल्जेरिया, बेल्जियम, ब्रिटन, चाड, पोर्तुगाल, सौदी अरेबिया आणि सुदान येथील प्रत्येकी एक प्रवासी होते.

(हे ही वाचा: Karachi University Blast: कराचीमध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्ला करणारी महिला होती उच्चशिक्षित; प्राणीशास्त्रातमध्ये घेतली होती मास्टर डिग्री)

हे विमान केवळ २००३ मध्ये सेवेत दाखल झाले, ज्यामुळे ३० ते ४० वर्षे चालणाऱ्या विमानासाठी ते तुलनेने नवीन होते. ते ३७,००० फूट (११,००० मीटर) वर उडत होते आणि ग्रीक बेट कार्पाथोसपासून सुमारे १३० नॉटिकल मैल दूर गायब झाले. ग्रीसजवळ खोल पाण्यात विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर एक मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली.

(हे ही वाचा: कराची विद्यापीठामध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्ला करणाऱ्या महिलेच्या पतीचं ट्विट viral, “तुझ्या निःस्वार्थी कृत्याने मला…”)

इजिप्शियन अधिकाऱ्यांनी त्यावेळी दावा केला होता की हे विमान दहशतवादी हल्ल्यात पाडण्यात आले होते, परंतु कोणत्याही दहशतवादी गटाने जबाबदारी स्वीकारली न्हवती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-04-2022 at 18:47 IST

संबंधित बातम्या