करोना महामारीच्या काळात समाजातील प्रत्येक घटक प्रभावित झाला आहे. याचा विद्यार्थ्यांनांही सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या दीड वर्षापासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. अनेक महत्त्वाच्या परीक्षा घेण्यात अडचणी आल्या. त्यामुळे प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मूल्याकनाद्वारे पास करण्यात आलं आहे. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे निकालांमध्ये इतर वर्षांपेक्षा मोठी वाढ झाली आहे. यावरूनच विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी त्यांच्यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. दरम्यान, यासर्वांमध्ये आता एचडीएफसी बँकेने दिलेल्या एका जाहिरातीची जोरदार चर्चा होत आहे.

एका व्हायरल होणाऱ्या जाहिरातीमध्ये एचडीएफसी बँकेने तामिळनाडूतील काही पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्या जाहिरातीमध्ये ‘२०२१ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र नाहीत’(2021 passed out candidates are not eligible) असं लिहिले आहे. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या कामाच्या जाहिरातीमध्ये एचडीएफसी बँकेचा लोगो वापरण्यात आला आहे. ‘आम्हाला तुमचे जग समजते.’ असेही त्याखाली लिहिले आहे. २८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र असतील असे त्या जाहिरातीमध्ये म्हटले आहे.

how to plant flower plant it garden
Gardening tips : उन्हाळ्यातही सदा बहरलेली राहील सदाफुली! रंगीबेरंगी फुलांसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल
how VVPAT works
विरोधी पक्षांना EVM पेक्षा VVPAT मशीन का आवडते? राजकीय पक्षांना सर्व स्लिप्सची पडताळणी का हवी आहे?
Rashmika Mandanna and Ranbir Kapoor in Animal
‘ॲनिमल’मधल्या करवा चौथच्या सीनवरुन झालेल्या ट्रोलिंगवर रश्मिकाने सोडलं मौन, म्हणाली, “१० सेकंदाचा डायलॉग..”

ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एचडीएफसी बँकेवर काही युजर्सकडून टीका केली जात आहे. ‘मला वाटत नाही की एचडीएफसी बँक आमचे जग समजते’ असे एका युजरने म्हटले आहे.

दरम्यान आता याप्रकरणी एचडीएफसी बॅंकेकडून खुलासा करण्यात आला आहे. “हा एक टायपो आहे आणि आम्हाला त्या चुकीबद्दल खेद आहे. पदवीधर वयाचे निकष पूर्ण करेपर्यंत उत्तीर्ण वर्ष विचारात न घेता अर्ज करू शकतात. वॉक-इन मुलाखतीसंदर्भात योग्य जाहिरात देखील वर्तमानपत्रात देण्यात आली आहे. त्यानुसार पदवीधरांना वॉक-इन मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. तसेच यासाठी २०२१ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील पात्र आहेत,” असे एचडीएफसी बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले.