सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. हे माध्यम प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये असल्यामुळे येथे रोज वेगवेगळे व्हिडीओ चर्चेत येतात. या मंचावर एखाद्या प्राण्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो. तर कधी एखाद्या तरुण आणि तरुणीच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ उडतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ मात्र काहीसा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये प्राणी संग्रहालयातील एका राखणदाराने दाखवलेलं धाडस वाखाणण्याजोगे आहे. व्हिडीओतील या व्यक्तीने कशाचाही विचार न करता तब्बल २० फूटाच्या सापाने दिलेली अंडी काढून घेण्याचं धाडस केलंय.

जय ब्रेव्हर असं या प्राणी संग्रहालयातील राखणदाराचं नाव आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक माणूस दिसतो. हा माणूस प्राणी संग्रहालयात काही व्यक्तींना सापाबद्दलची माहिती सांगताना दिसून येतोय. एका निळ्या कापडाने झाकलेला मोठा बॉक्स उघडतो. यात दिसून येतो तो चक्क २० फूटाचा भयावह साप. सुरूवातीला हा साप आपलं डोकं वर काढतो आणि कॅमेरा पकडलेल्या व्यक्तीकडे आपला टार्गेट बनवताना दिसून येतो. काही क्षणातच तो कॅमेरा पडकलेल्या व्यक्तीच्या दिशेने चावा घेण्यासाठी येतो. पण त्या व्यक्तीने त्याच क्षणी आपला बचाव केला. त्यानंतर राखणदार त्या बॉक्समधून २० फूटाच्या सापाला बाजूला सारत सापाने दिलेली अंडी घेण्याच्या प्रयत्नात असतो. आपल्या अंड्याच्या संरक्षणासाठी सापाने राखदाराला चावा घेतला. पण हा साप विषारी नसल्याने राखणदाराचा जीव वाचला. राखणदार मोठ्या शिताफीनं या सापाला बॉक्सबाहेर काढून त्याची अंडी सुद्धा घेण्यात यशस्वी होतो.

त्या सापाने दिलेली अंडी घेण्यात मिळालेलं यश पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे झळकत होता. त्यानंतर हा राखणदार सापाला पुन्हा त्याच्या ठरलेल्या जागी नेतो.

साप म्हटलं तरी सर्वसामान्य माणूस दोन पावले मागे सरकतो. पण हा २० फूटाचा साप पाहिल्यावर भल्या भल्यांची त्रेधातिरपिट उडते. अशा २० फूटाच्या सापाला इतक्या सहजणे हाताळलं, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. हे दृश्य प्राणी संग्रहालयातील एका व्यक्तीने मोबाईल मध्ये चित्रित केले. नंतर याच प्राणी संग्रहालयातील राखणदाराने स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला.