scorecardresearch

२५ वर्षाच्या मुलीने ६० वर्षाच्या वृद्धासोबत केलं लग्न; लग्नानंतर तरूणीचे दिलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल

आजकाल एका वधू-वराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

25-year-old girl marries 60-year-old man
वधू-वराच्या वयातील एवढ्या मोठ्या अंतर जाणून सर्वच थक्क झाले आहेत. (Photo : Instagram/@bhutni_ke_memes)

भारतात लग्नाचा मोसम सुरू आहे. या दरम्यान दररोज लाखो जोडपी विवाहबद्ध होत आहेत. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ रोज शेअर केले जातात. हे व्हिडीओ असे आहेत, जे कोणत्या ना कोणत्या कारणाने व्हायरल होतात. लोक असे म्हणतात की जोड्या स्वर्गात तयार होतात. आजकाल अशाच वधू-वराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

या व्हिडीओमध्ये वराचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे दिसते. त्याच वेळी, वधू मात्र जवळपास २५ वर्षांची असावी. वधू-वराच्या वयातील एवढ्या मोठ्या अंतर जाणून सर्वच थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्सना, असेही होऊ शकते यावर विश्वासच बसत नाही आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती वराच्या पोशाखात बसलेला दिसत आहे. त्याच वेळी, वधू त्याच्या शेजारी हसताना दिसत आहे.

६ वर्षाची मुलगी बनली AIIMS ची सर्वात लहान ऑर्गन डोनर; वाचवले पाच जणांचे प्राण

व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याला समजते की वरमाळा घालण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. यानंतर वधू आणि वर दोघेही स्टेजवर बसलेले दिसतात. शेजारी बसलेल्या वधू-वराच्या वयात ३५ वर्षांपेक्षा जास्त अंतर असल्याचे पाहायला मिळते. वराला पाहून सगळे त्याला बाबाजी म्हणतात. तसेच, वराची दाढी पूर्णपणे पांढरी आहे. व्हिडीओ बनवण्यासाठी कॅमेरामन नववधूकडे कॅमेरा वळवतो तेव्हा सर्वात मजेदार गोष्ट व्हिडीओमध्ये दिसते.

रात्री १० नंतर रेल्वेमध्ये चुकूनही करू नका ‘ही’ कामं; अन्यथा होऊ शकते कारवाई

कॅमेरामनला पाहून नववधू लाजत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर तिने तिचा चेहरा पदरामध्ये लपवला. bhutni_ke_memes या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून बहुतांश युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत, तर काही लोक मुलगी गरीब असल्याचेही सांगत आहेत. म्हणूनच तिने या वृद्ध व्यक्तीसोबत लग्न केले असावे असे सांगण्यात येत आहे. मात्र, हा व्हिडीओ कुठचा आहे, हे कळू शकलेले नाही. कदाचित हा व्हिडीओ एखादा प्रॅन्कही असू शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 25 year old girl marries 60 year old man the reaction of a young woman after marriage is viral pvp