Premium

Video: धावत्या स्कूटीवर पडली झाडाची फांदी, तिघांचीही चिरडून भयानक अवस्था

 Viral: रएका विचित्र अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

3 Boy injured as tree branch fell on scooty accident video
Video: धावत्या स्कूटीवर पडली झाडाची फांदी

Accident video: सोशल मीडियावर तुम्ही हजारो वेगवेगळ्या अपघातांचे व्हिडिओ बघितले असतील. व्हायरल होणारे अपघाताचे व्हिडिओ इतके भयानक असतात की ते पाहून आपले हृदय पिळवटून जाते. हे व्हिडीओ आपल्याला कधी हसवतात तर कधी आपल्याला विचार करायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ हे अंगावर काटा आणणारे असतात. बहुतेक अपघात हे वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याने होतात. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनेक अपघाताचे व्हिडीओ यामध्ये कैद होत असतात. असाच एका विचित्र अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा अपघाताचाहा अजब व्हिडिओ राजस्थानमधील जोधपूरचा आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरून एक फांदी अचानक खाली पडताना दिसते. ही फांदी रस्त्यावरुन जात असलेल्या स्कूटीवर तिघांच्या डोक्यावर पडते. त्यामुळे स्कूटीवर बसलेले तिघे तरुण याखाली चिरडले जातात. ते पाहून स्थानिक लोक तात्काळ समोरून धावत येतात आणि त्यांना झाडाच्या फांदीखालून बाहेर काढताना दिसतात. वाहतूक पोलीस नेहमी आपल्याला हेल्मेट घालण्यासाठी सांगत असतात, तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करतात. या व्हिडीओमध्येही तेच दिसतंय. एका स्कूटरवर असलेल्या तिघांनीही हेल्मेट घातलेलं नाहीय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: वाघासोबत तरुणीचं फोटोशूट, सुरुवातीला शांत बसला काही क्षणातच…

सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे..नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 14:25 IST
Next Story
‘२००० नोट द्या आणि ३००० रुपयांचे जेवण खा’; ‘या शहरात रेस्टॉरंट मालकाने सुरू केली खास स्कीम