रेल्वेने प्रवास करताना झालेले अपघात हे अनेकदा प्रवाशांनी घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे होतात. अनेकदा प्रवासी धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात किंवा ट्रेनमधून उतरताना पडतात. मात्र बऱ्याच वेळास रेल्वे पोलीस आणि होम गार्ड अनेकदा या प्रवाशांच्या मदतीला धावून येतात आणि त्याचे प्राण वाचवतात. अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असा एक प्रकार नुकताच मुंबईमध्ये घडला. मात्र या घटनेमध्ये तीन सेकंदांच्या कालावधीत तीन तरुणी एकाच ट्रेनच्या एकाच डब्यातून खाली प्लटफॉर्मवर पडल्याचं दिसत आहे.

मुंबईतील रेल्वे पोलीस कमिश्नर कुशेर खलीद यांनी एक व्हिडीओ ट्विटवरुन शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओमधील घटना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. धावती लोकल ट्रेन पकडताना एक मुलगी प्लॅटफॉर्मवर पडल्यानंतर महिला डब्यामधील होम गार्डने प्लॅटफॉर्मवर उडी मारुन तिला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं. या होम गार्डने गाडीतून खाली उडी मारत ट्रेनजवळ प्लॅटफॉर्मवर पडलेल्या तरुणीला ट्रेनपासून दूर आणलं. हा प्रकार जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर १६ एप्रिल रोजी घडला. हा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालाय. मात्र या व्हिडीओत ही मुलगी ट्रेनमधून पडल्यानंतर होम गार्ड अल्ताफ शेख तिला ट्रेनपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतानाच ही ट्रेन वेग पकडताना दोन अन्य मुलींनी ट्रेनमधून उडी मारली. या मुलींनी धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि त्या प्लॅटफॉर्मवर पडल्या.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

या व्हिडीओला तीन दिवसांमध्ये १८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की या दोन मुलींनी धावत्या ट्रेनमधून अशा विचित्र प्रकारे उडी का मारली?

१)

२)

दरम्यान, प्रसंगावधान दाखवून मुलीचा जीव वाचवणाऱ्या होम गार्डचं कौतुक करतानाच त्याला विशेष बक्षीसही देण्यात आलंय.