scorecardresearch

Premium

धक्कादायक! ३ वर्षीय चिमुकलीच्या अंगावर पडला काचेचा दरवाजा; पालक मात्र खरेदीमध्ये व्यस्थ, हृदयद्रावक VIDEO व्हायरल

Shocking video: पालकांचा निष्काळजीपणा चिमुकलीच्या जीवावर बेतला! हृदयद्रावक VIDEO व्हायरल

3-year-old girl dies after glass door falls on her in Ludhiana panjab shocking video goes viral on social media
पंजाबमध्ये चिमुकलीच्या अंगावर काचेचा दरवाजा पडला

Viral video: असं म्हणतात की मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. लहान मुलं कितीही गोंडस असली तरी त्यांना सांभळणे फार अवघड काम आहे. जरा नजर हटेपर्यंत लहान मुलं काही ना काही गोंधळ घालून ठेवतात आणि तुमचे काम वाढते. कित्येकदा मुलं स्वत:सह दुसऱ्यांनाही संकट ओढतात. अशावेळी पालकांचे लक्ष नसेल त मोठा अनर्थ होऊ शकतो. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. मुलांवर नेहमी लक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. थोडासाही निष्काळजीपणा केला तर मोठी दुर्घटना घडते.अशाच एका भयानक घटनेनं सगळ्यांना हादरवून सोडलं आहे. पंजाबमधील लुधियाना येथून एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कुटुंबासोबत खरेदीसाठी गेलेल्या चिमुकलीच्या अंगावर काचेचा दरवाजा पडलाय.

चिमुकलीचा जागीच मृत्यू

Viral video when Father saw daughter in bridal look his emotional reaction capture in video goes viral on social media
वडिलांचे प्रेम! लाडक्या लेकीला नवरीच्या रुपात पाहून भावूक झाले वडील, मुलीवर केला कौतुकाचा वर्षाव; नेटकरी म्हणाले, “एवढं कौतुक फक्त वडिलच…”
24 Year Old Women Pee Turned Black Like Cola Rush To ICU Are You Overdoing Perfect Ratio For Work and Exercise by dr Mehta
तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र
throws puppy noida
संतापजनक! सात वर्षांच्या मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला २० फुटावरून फेकलं, FIR नंतर रहिवाशांचे आंदोलन
Fire in ginning in Chikhli loss of 10 lakhs
चिखलीतील ‘जिनिंग’मध्ये आग, १० लाखांचे नुकसान

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. पंजाब येथे एका कपड्यांच्या शोरूममध्ये तीन वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबासह गेली होती, यावेळी ती काचेच्या दरवाजाशी खेळू लागली. त्यानंतर अचानक दरवाजा त्या मुलीच्या अंगावर पडला, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती मुलगी शोरूममध्ये खेळत असताना दरवाजा तिच्या अंगावर पडला. या भीषण अपघातानंतर मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गगनदीप सिंह नावाच्या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनही लिहिले आहे की, ‘लुधियाना येथील एका कापडाच्या शोरूमचा काचेचा दरवाजा पडल्याने एका ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: महागड्या पेट्रोल-डिझेलचे टेन्शन दूर करण्यासाठी तरुणाचा देसी जुगाड; थेट म्हशीवर बसून उतरला रस्त्यावर

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मुलगी हँडल धरून दरवाजाभोवती खेळत असताना दरवाजा तिच्या अंगावर कोसळला आणि ती गंभीर जखमी झाली. बऱ्याचदा खरेदीला गेल्यावर पालक आपल्या मुलांना असंच बाजूला सोडतात. मात्र सतत त्यांच्यावर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपण थोडंसं जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते काय करून बसतील याचा आपण विचारसुद्धा करू शकणार नाही

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 3 year old girl dies after glass door falls on her in ludhiana panjab shocking video goes viral on social media srk

First published on: 29-11-2023 at 10:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×