Grizzly Bear Attack Video : जंगलातील प्राणी- पक्षांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये एका महिलेच्या मागे अस्वल लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा कठीण प्रसंगात पळण्याऐवजी महिलेने स्वतःचा बचाव करण्यासाठी जो मार्ग अवलंबला, त्यामुळे तिचा जीव वाचला. अस्वलाला पाहून घाबरून पळून जाण्याऐवजी तिने अस्वलालाच दमवण्यासाठी एक ट्रिक वापरली आहे, ज्यामुळे महिला नाही अस्वलचं जंगलात पळून गेला.

महिलेच्या आणि कुत्र्याच्या मागे लागलं अस्वल

हा व्हिडिओ कॅनडातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, महिला तिच्या पाळीव कुत्र्याबरोबर जंगलात ट्रेकिंग करत होती. तितक्यात अचानक एक विशाल ग्रिजली अस्वल त्यांच्या मागे लागले.

ग्रिजली अस्वलासमोर धैर्याने उभी राहिली महिला

व्हिडिओमध्ये सुमारे ३०० किलो वजनाचे ग्रिजली अस्वल महिला आणि तिच्या कुत्र्याचा पाठलाग करताना दिसत आहे. अस्वल कुत्र्याच्या मागे अशा रीतीने लागले होते की, संधी मिळताच ते त्याला फस्त करेल. अशा परिस्थितीत महिला वारंवार मागे वळून अस्वलाला पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये महिला मोठ्या आवाजात “दूर जा… नाही… मागे जा…” असे म्हणताना ऐकू येत आहे. महिलेच्या मनात प्रचंड भीती होती, पण तिने त्या भीतीला स्वतःवर हावी होऊ दिले नाही.

महिलेने अशा प्रकारे वाचवला जीव

काही वेळानंतर ते अस्वल अचानक वेगाने महिलेच्या दिशेने धावून आले. हा क्षण इतका थरारक आणि भयानक होता की कोणाचाही थरकाप उडेल. पण सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे महिला तिथून पळाली नाही. ती सावधपणे मागे सरकत राहिली आणि मोठ्या आवाजात अस्वलाला घाबरवून पळवण्याचा प्रयत्न करत राहिली. काही सेकंद असे वाटले की, आता अस्वल महिला आणि तिच्या कुत्र्यावर हल्ला करणार, पण महिलेच्या धैर्याने संपूर्ण परिस्थिती बदलली. अखेर ग्रिजली अस्वल थांबले. त्याने काही क्षण महिलेकडे पाहिले आणि नंतर ते जंगलाच्या दिशेने परत निघून गेले. यानंतर महिलेने सुटकेचा श्वास सोडला आणि ती आपल्या कुत्र्यासह तातडीने तिथून सुरक्षित बाहेर पडली.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ‘X’ (ट्विटर) वर @TonyLaneNV नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यावर आता युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत, अनेकजण महिलेच्या धैर्याचे कौतुक करतातय,