40 Employees Get 70 Crore Bumper Bonus By Company For Best Work in 2022-23 Employee Gets Tired | Loksatta

पैशांचा पाऊस! ‘या’ कंपनीने ४० कर्मचाऱ्यांना दिला ७० कोटींचा बंपर बोनस; नोटांचे बंडल उचलताना झाली दमछाक

Company Gives 70 Crore Bumper Bonus: पहिल्या क्रमांकाची रक्कम इतकी जड होती की ती उचलून नेण्यासाठी एका ग्रुपला स्टेजवर यावे लागले.

40 Employees Get 70 Crore Bumper Bonus By Company For Best Work in 2022-23 Employee Gets Tired
'या' कंपनीने ४० कर्मचाऱ्यांना दिला ७० कोटींचा बंपर बोनस (फोटो: ट्विटर)

China Company Gives 70 Crore Bumper Bonus: एकीकडे जगभराला मंदीचा तडाखा बसला आहे. गूगल, अमेझॉनसारख्या बड्या कंपनी सुद्धा कर्मचारी कपात करत आहेत. अशातच एका चिनी कंपनीने आपल्या ४० कर्मचाऱ्यांना ७० कोटींचा बंपर बोनस दिला आहे. याविषयी कंपनीच्या जनसंपर्क विभागातील व्यवस्थापकाच्या हवाल्याने माध्यमांनी माहिती दिली आहे. हेनान माइन या फर्ममधील तीन सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सेल्स मॅनेजर्सना प्रत्येकी पाच दशलक्ष युआन (US$737,000) चा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 6 कोटी रुपये इतकी आहे तर ३० हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक मिलियन युआन म्हणजेच सुमारे १ कोटी २० लाखांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितले की, आम्ही १७ जानेवारी रोजी संध्याकाळी वर्षाच्या अखेरीस एक सेल्स मिटिंग घेतली. त्यामध्ये ४० सेल्स मॅनेजर्सना एकूण ६१ दशलक्ष युआन एवढी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. कॉर्पोरेशनने या स्पर्धेसाठी तब्बल १२ दशलक्ष युआन खर्च केले, सर्वात वेगवान नोट काउंटरला १,५७,००० युआन देण्यात आले.

हे ही वाचा<< दादागिरीची किंमत ८ कोटी! लॉटरीच्या रांगेत गरिबाला ढकलून जागा घेणाऱ्यावर आली रडायची वेळ, नेमकं काय झालं?

सोशल मीडियावर या बक्षीस समारंभातील काही फोटो सुद्धा चर्चेत आले आहेत. यात पहिल्या क्रमांकाची रक्कम इतकी जड होती की ती उचलून नेण्यासाठी एका ग्रुपला स्टेजवर यावे लागले. दरम्यान या बंपर बोनसची चर्चा सोशल मीडियावर सुरु होताच अनेकांनी कमेंट केली आहे. एका व्यक्तीने Weibo वर लिहिले,आम्हाला बोनस सोडा पगार पण अर्धा कापून देतात अशा कमेंटने नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे ही वाचा<< Budget 2023: माझ्या अकाउंटला तर ५७५ रुपये.. Income Tax घोषणेनंतर अफलातून Memes झाले व्हायरल

२००२ मध्ये स्थापन झालेल्या हेनान माइनमध्ये ५,१०० हून अधिक कर्मचारी आहेत आणि २०२२ मध्ये कंपनीने ९. १६ अब्ज युआन (US$1.1 बिलियन) विक्री महसूल नोंदविला आहे. २०२१ च्या तुलनेत ही २३ % ची वाढ आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 13:20 IST
Next Story
Video: दारुच्या नशेत रिक्षाचालकाने समोर येईल त्या वाहनाला दिली धडक, पोलिसांसमोर घडली धक्कादायक घटना