Chanakya’s 5 Shlokas on Life, Relationships, Knowledge : आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीमध्ये जीवन, ज्ञान, नातेसंबंध, वर्तनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचे श्लोक माणसाला परिस्थिती समजून घेण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास शिकवतात. तर काही श्लोक आपल्याला जीवनात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सांगतात, तर काही गोष्टी ज्ञान, सराव आणि नातेसंबंधांबद्दल विचार करण्यास प्रेरित करतात. तर आज आपण आचार्य चाणक्यांच्या अशा ५ श्लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे जीवनाचे महत्वाचे धडे देतात.

एकाकिना तपो द्वाभ्यां पठं गायनं त्रिभिः। चतुर्भिर्गमनं क्षेत्रं पंचभिर्बहुभि रणः।

तपश्चर्या एकट्याने, अभ्यास दोघांनी, गायन तिघांनी तर यात्रा चौघांनी आणि युद्ध अनेक लोकांनी मिळून केले जाते. त्यामुळे किती जण सहभागी आहेत, त्यानुसार कृती ठरवल्या जातात.

अपुत्रस्य गृहं शून्यं दिशः शून्यास्त्वबान्धवाः। मूर्खस्य हृदयं शून्यं सर्वशून्यं दरिद्रता॥

जिथे मुलांचा सहवास नसतो, ते घर अगदी शांत-शांत वाटते. भावंडांची साथ नसेल, तर आयुष्यात काहीशी पोकळी जाणवते. विचारांची समज नसेल, तर मन योग्य दिशा शोधू शकत नाही आणि आर्थिक अडचणी असतील, तर अनेक गोष्टी असूनही त्यांचा आनंद घेणे कठीण होऊन जाते.

अध्वा जरा मनुष्याणां वाजिनां बन्धनं जरा। अमैथुनं जरा स्त्रीणां वस्त्राणाम् आतपो जरा॥

या श्लोकात सांगितले आहे की, सतत प्रवास केल्यामुळे माणूस थकतो, घोड्याला सतत बांधून ठेवल्याने त्याची क्षमता कमी होऊ शकते, स्त्रीच्या गरजांकडे दुर्लक्ष केल्याने तिच्यावर परिणाम होऊ शकतो आणि कपडे उन्हात वाळवल्याने ते हळूहळू खराब होऊ शकतात.

अनभ्यासे विषं विद्या अजीर्णे भोजनं विषम्। विषं सभा दरिद्रस्य वृद्धस्य तरुणी विषम्॥

मिळवलेले ज्ञान योग्य वेळी वापरले नाही, तर त्याचा उपयोग होत नाही. अपचन झाल्यावर अन्न त्रासदायक ठरते. आर्थिक अडचणी असतील, तर सभेत सहभागी होणे अवघड वाटू शकते. तसेच, वृद्धापकाळात तारुण्याच्या आठवणी मनाला दुःख देऊन जाऊ शकतात.

त्यजेद्धर्म दयाहीनं विद्याहीनं गुरुं त्यजेत्। त्यजेत्क्रोधमुखीं भार्या निः स्नेहान् बान्धवांस्त्यजेत्॥

ज्या धर्मात दया आणि प्रेमाला महत्त्व दिले जात नाही, त्यापासून दूर राहावे. पुरेसे ज्ञान नसलेल्या शिक्षकाकडून शिकताना विचार करावा. सतत रागावणाऱ्या व्यक्तीशी नाते जपताना काळजी घ्यावी. तसेच, ज्या नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी नसते, अशा नात्यांपासून योग्य अंतर ठेवणे चांगले.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)