या म्हणजे इतरांच्या दुःखाची जाणीव होऊन त्यांच्याबद्दल मनात निर्माण होणारी करुणा, सहानुभूती आणि मदत करण्याची भावना. आणखी सोप्या शब्दा सांगायचं झालं तर, दुसऱ्याच्या वेदना समजून घेऊन त्याला मदत करावीशी वाटणे म्हणजे दया. पण आजच्या काळात खरचं माणसाच्या मनात दया उरली आहे का? असा प्रश्न अनेकदा मनात डोकावतो पण जोपर्यंत जगात निर्मळ मनाचे लोक आहेत तोपर्यंत जगात दयाळूपणा कायम अस्तित्वात राहील.

चिमुकलीच्या निरागस मनाने जिंकले जग

आजच्या धावपळीच्या, स्वार्थी आणि सतत वाद-भांडणे, द्वेष-मत्सरने भरलेल्या जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची जाणीव करून देणारा एक छोटासा पण हृदयाला भिडणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. अवघ्या पाच वर्षांच्या एका चिमुकलीने आपल्या दिव्यांग मित्रासाठी दाखवलेला दयाळूपणा पाहून अनेकांचे मन भरून आले आहे. निरागस वयातही दुसऱ्यांच्या वेदना समजून घेणारी ही छोटी मुलगी सर्वांसाठी माणुसकीचा सुंदर धडा ठरली आहे.

;५ वर्षांच्या मुलीने दाखवला दयाळूपणाचा खरा अर्थ

हा व्हिडीओ एका शाळेतील आहे. त्यामध्ये हात नसलेल्या आपल्या वर्गमित्राला एक छोटी मुलगी प्रेमाने जेवण भरवत असल्याचे दिसते. मुलगा शांतपणे तिच्या बाजूला उभा असतो आणि ती अत्यंत संयमाने त्याला चमच्याने घास भरवत राहते. एवढंच नाही, तर जेवताना त्याच्या चेहऱ्यावर काही लागल्यावर ती प्रेमाने त्याचा चेहराही पुसताना दिसते. आसपास इतर लहान मुलेही उभी असतात, पण त्या दोघांमधील मैत्री आणि दयाळूपणा सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.

चिमुकलीचा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक

हा भावनिक व्हिडीओ “Good News Correspondent” या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

५ वर्षांची मुलगी हात नसलेल्या तिच्या वर्गमित्राला जेवण खाऊ घालते. चला, दयाळूपणाने जग बदलूया! असे कॅप्शन दिले असून सुंदर संदेश देण्यात आला. काही सेकंदांचा हा व्हिडीओ असला तरी त्याने लाखो लोकांच्या मनात माणुसकीबद्दल नवा विश्वास निर्माण केला.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्स भावुक झाले. “हीच खरी शिक्षणाची सुरुवात आहे,” असे एका युजरने लिहिले. तर दुसऱ्याने, “या छोट्या मुलीकडून मोठ्यांनी दयाळूपणा शिकायला हवा,” अशी प्रतिक्रिया दिली. काहींनी हा क्षण “शुद्ध आणि निरागस प्रेम” असल्याचे म्हटले, तर हा व्हिडीओ पाहून अनेकांनी डोळ्यांत अश्रू आल्याचे सांगितले.

आजच्या स्वार्थी जगात आशेचा किरण

आजच्या काळात दयाळूपणा, सहानुभूती आणि माणुसकी या गोष्टी कमी होत चालल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र या छोट्याशा मुलीने कोणताही मोठा उपदेश न देता आपल्या कृतीतून जगाला एक सुंदर संदेश दिला. दुसऱ्याला मदत करण्यासाठी मोठं असणं गरजेचं नसतं, फक्त मन मोठं असावं लागतं. तिच्या या छोट्याशा कृतीने इंटरनेटवर लाखो लोकांच्या हृदयात आशेचा एक नवा किरण निर्माण केला आहे.