सोशल मीडियावर सध्या एका भयानक घटनेची चर्चा सुरु आहे. जी वाचल्यानंतर तुम्हालाही धक्का बसू शकतो.ती म्हणजे एका सहा महिन्यांच्या चिमुकल्याची बोटे उंदरांनी खाल्ली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या मुलाला उंदरांनी जखमा केल्या त्यावेळी त्याचे आई-वडील गाढ झोपले होते. तर मुलाच्या शरीरावर ५० हून अधिक उंदीर चावल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. हे प्रकरण अमेरिकेतील इंडियाना येथील असून या घटनेची माहिती मुलाच्या वडिलांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली आहे. पोलिसांना त्यांनी सांगितलं की, ६ महिन्याच्या मुलाच्या शरीरावर उंदीर चावल्याच्या गंभीर जखमा आहेत. यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, ही घटना मागील आठवड्यात घडली आहे.
याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी मुलाचे वडील डेव्हिड आणि आई एंजिल स्कोनाबॉम यांना अटक केली आहे. शिवाय या दोघांबरोबर राहणाऱ्या एका महिलेलादेखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध निष्काळजीपणासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर या जोडप्याला एकून तीन मुले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांना ६ महिन्याचा मुलगा रक्ताने माखलेला दिसला. त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर उंदीर चावल्याच्या ५० हून अधिक जखमा झाल्या होत्या.
पोलीस अधिकारी जोनाथन हेल्म यांनी मुलाच्या उजव्या हाताची चार बोटे आणि अंगठा गायब असल्याचेही सांगितलं. शिवाय या मुलाच्या बोटांची हाडे दिसत होती. मुलाला रुग्णालयात नेले तेव्हा त्याच्या शरीराचे तापमान लक्षणीयरीत्या कमी झाले होते त्यामुळे त्याला रक्त चढवावे लागल्याचंही त्यांनी सांगितले, तर सुदैवाने मूल जिवंत आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ज्या घरात मुलाला जखमा झाल्या आहेत ते घर कचरा आणि उंदराच्या विष्ठेने भरलेले होते. मार्च महिन्यापासून या घरात उंदरांचा त्रास होत असून त्यासाठी उपाययोजनाही केल्या होत्या असे मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. मात्र या घरात उंदराने लहान मुलाला खाण्याची ही पहिलीच वेळ नसून सप्टेंबरमध्ये घरातील इतर मुलांनाही चावा घेतल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना तपासात समजली.
हेही पाहा- Video : “गर्दीत देव, वर्दीत देव” ! पोलिसांनी बाप्पाच्या दर्शनासाठी चिमुकल्यांचा मार्ग केला सोपा…
त्याच घरातील दोन मुलांनी ते झोपेत असताना उंदरांनी पायाची बोटे खाल्ल्याचे शिक्षकांना सांगितले होते. यानंतर बालसेवा विभागाचे अधिकारी त्यांच्या घरी आले. तेव्हा मुलांच्या आईने सांगितले की घरात काही उंदीर होते आणि त्यांनी मुलांना कोणतेही नुकसान केले नाही.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 month old boys fingers were eaten by rats while parents were sleeping police investigation revealed shocking information jap