आजकाल, एका सहा वर्षाच्या गोंडस मुलीची चूक आणि जगातील प्रसिद्ध टेनिसपटूची मजेदार उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ५० वर्षीय टेनिस स्टार लिएंडर पेसला कोण ओळखथ नाही. पण एका चिमुकलीने त्याला चुकून डान्सर समजले. चिमुकलीच्या या गोंडस चुकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो इतका व्हायरल झाला की तो दिग्गज खेळाडू लिएंडर पेसने देखील तो पाहिला. एवढचं नाही तर त्याने या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिली आहे. त्याचे उत्तर ऐकून नेटकऱ्यांचे चेहऱ्यावर हसू उमटले आहे. चिमुकलीने लता मंगेशकर आणि विराट कोहलीला अचूक ओळखले खरंतर, शाळेत शिकणाऱ्या मुलीने काही दिग्गज व्यक्तींचे नाव आणि ते कोणत्या क्षेत्रात काम करत आहे अशी जोड्या लावाल्या आहेत. या निरासग मुलीने दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली यांना अचूक ओळखले आहे. खरतरं प्रभुदेवा एक डान्सर आहे आणि लिएंडर पेस हा प्रसिद्ध खेळाडू आहे हे सर्वांना माहित आहे. पण प्रभूदेवा आणि लिएंडर पेसच्या कामाबाबत तिचा गोंधल झाला आहे. तिने प्रभू देवाला टेनिस खेळाडू आणि लिएंडर पेसचे डान्सर असे सांगितले आहे. हेही वाचा - चिडलेल्या हत्तीने सोंडेने उचलली पर्यटकांची गाडी! लोकांचा आरडा-ओरडा ऐकून काळजात होईल धस्स; पाहा थरारक व्हिडीओ प्रभू देवा आणि लिएंडर पेसमध्ये चिमुकलीचा खेळाडू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मुलीच्या काकांने Prithvi नावाच्या हँडलवरून ही मजेशीर चूकीचा फोटो पोस्ट केला आहे. पृथ्वीने लिएंडर पेसला या पोस्टमध्ये टॅग केले आहे. फोटोमध्ये एका गृहपाठाच्या पुस्तकाचे चित्र दिसत आहे. ज्यामध्ये एका बाजूला लिएंडर पेस, विराट कोहली, लता मंगेशकर, प्रभु देवा यांची नावे आहे तर दुसरीकडे क्रिकेटर, डान्सर, टेनिस खेळाडू, सिंगर यांची चित्रे दिली आहे. पृथ्वीने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "माझ्या ६ वर्षांच्या भाचीला वाटते की टेनिस दिग्गज @ लिएंडर एक डान्सर आहे." या मुलीने लिएंडर पेसला डान्सर आणि बॉलीवूडचा डान्स किंग प्रभू देवाला टेनिसपटू असे नाव दिले आहे. हेही वाचा - झोपण्यासाठी फक्त ४ तास, JEE परिक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे वेळापत्रक पाहून जेईईच्या उमेदवारांना धक्का बसेल पेसने "अफवा खऱ्या आहेत" असे म्हणत दिली मजेशीर प्रतिक्रिया मुलाच्या गोंडस चुकीने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. या पोस्टने दिग्गज टेनिसपटूचेही लक्ष वेधले. त्याच्या प्रतिक्रियेची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. पेसने सलमान खानच्या 'ओह जाने जाना' या लोकप्रिय गाण्याची व्हिडिओ क्लिप पोस्ट केली आहे, परंतु त्यात सलमान खानच्या चेहऱ्यावर त्याचा चेहरा एडीट करून लावलेला आहे आणि त्याचे मीममध्ये रुपांतर केले आहे. त्याने एका ६ वर्षांच्या गोंडस मुलीची कल्पना प्रत्यक्षात आणली. "अफवा खऱ्या आहेत," असे म्हटले आहे.