सावधान! रेस्टॉरंटमध्ये जाताय, वेटरने ग्राहकांना फ्रुट ज्यूसऐवजी चक्क लिक्विड डिटर्जेंट दिलं, ७ जणांना बाधा | 7 people hospitalized as waiter serves Liquid Detergent Instead Of Fruit Juice in china restaurant china latest news update nss 91 | Loksatta

सावधान! रेस्टॉरंटमध्ये जाताय, वेटरने ग्राहकांना फ्रुट ज्यूसऐवजी चक्क लिक्विड डिटर्जेंट दिलं, ७ जणांना बाधा

रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना लिक्विड डिटर्जेंट दिल्यानंतर महिला वेटरने केला धक्कादायक खुलासा.

Restaurant In China Serves Liquid Detergent
एका रेस्टॉरंटमध्ये सात जणांना बाधा झाली आहे. (Image-Graphics Team)

चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना फळांच्या ज्यूसऐवजी लिक्विड डिटर्जेंट देण्यात आलं. या लिक्विडचं सेवन केल्यामुळं ७ जणांना बाधा झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चीन मधील झेजीयांगमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती साउथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये देण्यात आलीय. एक महिला तिच्या कुटुंबियांसोबत रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असताना वेटरने ज्यूसऐवजी लिक्विड डिटर्जेंट दिलं. त्यानंतर महिलेसह सहा जणांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

एका वेटरच्या डोळ्यांची दृष्टी कमकुवत असल्याने हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली. रेस्टॉरंटमध्ये बाधा झालेल्या सात जणांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालायतून लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती चीनमधील (Xucun) पोलिसांनी दिली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेनं सांगितलं की, “आम्ही सात जणांनी एकत्रित जेवण केलं. त्यानंतर आम्हाला पोटात मळमळ झाल्यासारखं जाणवू लागलं. माझ्या पतीने पहिला सिप घेतल्यानंतर त्या लिक्विडची टेस्ट कडू असल्याचं जाणवलं. त्यानंतर इतरांना या लिक्विडबाबत तातडीनं सागंण्यात आलं. मी एक सिप घेतल्यानंतर माझ्या घशात वेदना होऊ लागल्या.”

नक्की वाचा – UPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती, IAS अधिकारी झाल्यावर वेतन किती? घर, गाडीसह ‘इतक्या’ सुविधा मिळणार

मला खूप अनुभव नसल्याने आणि दृष्टी कमकुवत असल्याने ही धक्कादायक घटना घडली. मी नेहमी रेस्टॉरंटमध्ये काम करत नाही. त्या दिवशी मी फक्त इतर स्टाफला मदत करण्यासाठी आले होते, अशी प्रतिक्रिया रेस्टॉरंटमधील महिला वेटरने दिली. कोणत्या प्रकारचं फ्लोअर क्लिनर ग्राहकांना देण्यात आलं, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाहीय. ऑरेंज कलरचा फ्लोर क्लिनरच्या एका प्लास्टिक डब्यातून हा लिक्विड देण्यात आला होता. दरम्यान, चीनमधील या रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 11:27 IST
Next Story
Video: मुलीच्या हट्टापायी ‘ती’ ने गायले गाणे अन् थेट सोनू सूदकडून मिळाली ऑफर