एक सात वर्षाचा मुलगा झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. वडिलांचा अपघात झाल्यानंतर, या मुलाने त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी फूड डिलिव्हरीचं काम करायला सुरुवात केली. जो आता झोमॅटोसाठी डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतो. राहुल मित्तल नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला असून त्याला ४३ हजारांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. एवढ्या कमी वयात या चिमुकल्याने आपल्या कुटुंबासाठी घेतलेल्या या जबाबदारीचे कौतुक सर्वत्र होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या मुलाचा व्हिडीओ अवघ्या ३० सेकंदाचा आहे. ज्यात राहुल मित्तल नावाचा व्यक्ती त्या लहान मुलाशी बोलत असल्याचे दिसत आहे. तो हे काम का करतो असा प्रश्न तो या मुलाला विचारतो. त्यावर हातात चॉकलेट्सचा बॉक्स धरलेला हा मुलगा ट्विटर युजर्सना त्याच्या कामाचं वेळापत्रक समजावून सांगताना दिसत आहे. मुलगा घरोघरी अन्न पोहोचवण्यासाठी सायकलचा वापर करतो असंही तो यावेळी सांगतो.

( हे ही वाचा: Optical Illusion: या फोटोत जिराफ लपला आहे, शोधताना भल्या भल्यांना फुटला घाम, तुम्ही शोधू शकता का?)

राहुल मित्तल यांनी आपल्या ट्वीटमध्ये फूड डिलिव्हरी कंपनीला टॅग केलं आहे. तसंच कॅप्शनमध्ये लिहिलंय, “हा सात वर्षांचा लहान मुलगा त्याच्या वडिलांच्या जागी काम करत आहे कारण त्याच्या वडिलांचा अपघात झाला आहे, हा मुलगा सकाळी शाळेत जातो आणि शाळेतून आल्यानंतर ६ नंतर तो झोमॅटोमध्ये काम करतो” असं त्याने म्हटलं आहे. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, तो ६ ते ११ या वेळेत सायकलवर घरोघरी जाऊन ऑर्डर्स देतो आणि सकाळी शाळेत जातो. ट्विटर युजर्स हे ऐकून भावूक झाले आणि अनेकांनी या मुलाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

( हे ही वाचा: Viral Video : हरिद्वारमधील हर की पौरी घाटावर गंगा नदीत माणसाने फडकावला तिरंगा, पाहा व्हिडीओ)

नेटीझन्सची प्रतिक्रिया

एका युजरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कृपया मला अधिक माहिती शेअर करावी, त्याचा अभ्यास आणि खर्चाची काळजी आम्ही घेऊ.” तर दुसऱ्या एकाने म्हटलंय “मुलाचे परिश्रम, त्याचा दृढनिश्चय आणि मदतीचा स्वभाव त्याच्या अभ्यासाशी जोडला गेला तर तो समाजासाठी किती चांगले काम करू शकेल याची कल्पना करा”. तर काहींनी यावर कंमेंट करत हे कामगार कायद्याचे उल्लंघन आहे असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 year old son becomes zomato delivery boy after fathers accident works till 11 pm on bicycle gps
First published on: 05-08-2022 at 13:11 IST