कोणत्याही गोष्टीबद्दल तुमची आवड पूर्ण करण्यासाठी खूप समर्पण आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात. समर्पण आणि कठोर परिश्रम आणि बर्‍याच सरावामुळे व्यक्ती परिपूर्ण बनते. याच गोष्टीचं उतम उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ७३ वर्षीय आजोबा इगोर हे स्केटबोर्डिंग करत आहे, जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये, इगोर यांनी बेरेट आणि जॅकेट घातलेला आहे. ते स्केटबोर्डवर सावधपूर्वक चढतात. त्यानंतर जे घडले ते सगळ्यांसाठी आश्चर्यचकित करणारे होते कारण ते बोर्डसह सहजतेने फिरत होते. रिकाम्या रस्त्यावर बोर्डवर स्वार होत, ते खूप मज्जा करत असल्याचे दिसत होते.

इगोर १९८१ पासून स्केटबोर्डिंग करत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “इगोर ७३ वर्षांचे आहे. इगोर पासून त्याच्या बोर्डवर स्वार होतात.” इंस्टाग्राम वापरकर्ता मॅक्स तिमुखिनने अपलोड केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १२.२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि व्हिडीओवर कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “आजची माझी प्रेरणा.” दुसऱ्याने लिहिले, “लेजेंड”

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 73 year old many put their fingers in their mouths after watching the abandoned video of grandfathers skating ttg
First published on: 25-09-2021 at 16:11 IST