प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. पण आता शिक्षणालाही वयाची मर्यादा नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आई-वडील काबाडकष्ट करून आपल्या लेकरांचा सांभाळ करतात आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करत असतात. पण एखाद्या कुटुंबात आधारस्तंभ असणाऱ्या बापाचं छत्र हरपल्यावर किती बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल, याचा अंदाज बांधणे कठीणच. कारण मिझोरामच्या चम्फाई जिल्हा्यातील खुआंगलेंग खेड्यात राहणारा ७८ वर्षांचा एक वृद्ध व्यक्ती अजूनही इयत्ता नववीतच धडे गिरवत आहे. वडीलांचं निधन झाल्यानंतर आईचा सांभाळ करत असताना जीवनात अनेक चढउतार आले आणि शिक्षणापासून या वक्तीला दिर्घकाळ वंचित राहावं लागलं. परंतु, यशाचं शिखर गाठण्याचं ध्येय उराशी बाळगणाऱ्या या आजोबांनी जिद्द ठेवली आणि शिक्षणाचा पाढा वाचणं सुरुच ठेवलं. लालरिंगधारा असं या वृद्ध व्यक्तीचं नाव असून शाळेत जाण्यासाठी ते रोज ३ किमीची पायपीट करतात. नक्की वाचा - Viral Video: खतरनाक सापाने तरुणीच्या चेहऱ्यावर घेतला चावा! किस करायला गेली अन् होत्याचं नव्हतं झालं राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान विद्यालयात लालरिंगधारा यांनी इयत्ता ९ वीत प्रवेश घेतला आहे. भारत-म्यानमार सीमेजवळ असलेल्या खुआंगलेंग खेड्यात १९४५ मध्ये त्यांचा जन्म झाला. वडीलांचं निधन झाल्याने त्यांना माध्यमिक शाळेतील शिक्षण पूर्ण करता आले नाही. तसंच ते एकुलते एक असल्याने वडीलांच्या निधनानंतर त्यांना आईचा सांभाळ करावा लागला आणि शेतीच्या कामाकडेही लक्ष द्यावे लागले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना योग्यवेळी उच्च शिक्षण घेता आलं नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी लालरिंगधारा प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. १९९५ मध्ये ते न्यू ह्यूआयकॉन या गावात स्थायिक झाले. माध्यमांच्या रिपोर्टनुसार, लालरिंगधारा यांना इंग्रजी भाषेचं शिक्षण घ्यायचं होतं आणि दूरदर्शनवर येणाऱ्या बातम्य समजून घ्यायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी पुन्हा शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. लालरिंगधारा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "मिझो भाषेवर प्रभुत्व असून मला ही भाषा वाचता आणि लिहिता येते. मात्र, इंग्रजी भाषेची आवड असल्याने पुढील शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी भाषा ही साहित्यात वापरली जाते. मला इंग्रजी भाषा नीट समजावी म्हणून मी शाळेत जाण्याचं ठरवलं आणि पुढील शिक्षणाला हिरवा कंदिल दिला."