scorecardresearch

‘क्विन’ आजीबाईंची कमाल! ८३ व्या वर्षी कॅरम स्पर्धेत जिंकलं सुवर्ण, एकेरीत कांस्यपदकावरही मारली बाजी, पाहा Video

८३ वर्षांच्या आजीबाईंनी पुण्यात आयोजित केलेल्या कॅरम स्पर्थेत सुवर्ण पदकावर बाजी मारली, पाहा व्हिडीओ.

‘क्विन’ आजीबाईंची कमाल! ८३ व्या वर्षी कॅरम स्पर्धेत जिंकलं सुवर्ण, एकेरीत कांस्यपदकावरही मारली बाजी, पाहा Video
८३ वर्षांच्या आजींनी कॅरम स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं. (Image-Twitter)

Carrom Tournament In Pune Viral News : वय फक्त एक नंबर असतं, असं म्हटलं जातं. पण ते सत्यच आहे. कारण तुम्ही उत्तम कलागुणांची धगधगती मशाल हाताक घेऊन जेव्हा वाटचाल करता तेव्हा यशाची गुरुकिल्लीच तुमच्या हातात असते. वय वाढल्यानंतर शरीराला थकवा जरी जाणवत असला, तरी काही माणसांकडे तल्लख बुद्धी असते. अशाचं प्रकारचं बुद्धीला कस लावणारं उत्तम उदाहरण व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. कारण पुण्यातील ८३ वर्षांच्या आजीबाईंनी कॅरेम स्पर्धेत पदकांची लयलुट केली आहे. कॅरमच्या दुहेरी स्पर्धेत सुवर्ण तर एकेरीत कांस्यपदक जिंकून आजीबाईंनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ८३ व्या वर्षी आजीबाईंनी केलेली कमाल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आजीबाईंना मिळालेलं यश पाहून नातू अक्षय मराठेलाही खूप आनंद झाला. अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर आजीचा व्हिडीओ शेअर करत जबरदस्त कॅप्शनही लिहिलं आहे.

पुण्याच्या ऑल मगरपट्टा सीटी कॅरम टुर्नामेंटमघ्ये आजीबाईंनी मारली बाजी

आजीचा नातू अक्षय मराठेने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रतिस्पर्धी तरुणीसमोर कॅरम स्पर्धेत स्ट्रायकरचे अचूक शॉट्स मारताना आजीबाई या व्हिडीओत दिसत आहेत. आपली आजी कॅरमच्या दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदक आणि एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याने नातवाला अभिमान वाटलं आणि अक्षयने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. पुण्यात ऑल मगरपट्टा सिटी टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. अक्षये ट्विटरवर पोस्ट शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये म्हटलं, “पुण्यात आयोजित केलेल्या ऑल मगरपट्टा सीटी कॅरम टूर्नामेंटमघ्ये माझ्या ८३ वर्षांच्या आजीने कॅरमच्या दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदक आणि एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. आजीकडून मला प्रेरणा मिळाली आहे. कॅरम खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या एका तरुण मुलीचा माझ्या आजीने पराभव केला.”

नक्की वाचा – Video : हजारो फूट उंचीवरून गरुडाने धरला नेम, थेट पाण्यात डुबकी मारून माशाची केली शिकार, थरार एकदा पाहाच

इथे पाहा व्हिडीओ

अक्षयने शेअर केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अक्षय आणि त्याचे मित्र आजीसोबत कॅरम खेळताना दिसत आहेत. कॅरम खेळायचा सराव करतानाच आम्ही आजीसोबत थोडसं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय. माझा मित्र अभिजीत दिपके आणि मी आजीच्या कॅरम खेळण्याच्या कौशल्यासमोर फार काळ टिकलो नाहीत, असंही त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. अक्षयने ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. लव्ह आणि हर्ट इमोजी पाठवून नेटकऱ्यांनी आजीबाईंना भरघोस शुभेच्छा दिल्या. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, आजीसाठी खूप सारं प्रेम…तिच्याकडून प्रेरणा मिळाली.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 10:08 IST

संबंधित बातम्या