Premium

९ वर्षाच्या लेकीच्या काखेत दुपारी दुखू लागलं, रात्री ओठ जांभळे पडले मग.. आईने सांगितलेली कहाणी वाचून व्हाल सुन्न

9 Year Old Girl Suffer Story: अलीकडेच समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणात एका ९ वर्षीय चिमुकलीला काखेतील दुखण्यामुळे तब्बल ६ दिवस त्रास सहन करावा लागल्याचे समजतेय.

9 year old Girl Feels Shooting Pain In Armpits Her Lips Turned Purple Mother Finds Out Real Reason Will Make Your Mind Blown
9 Year Old Girl Suffer Story: तिला इतक्या वेदना होत होत्या की ती अक्षरशः थरथरत होती.(फोटो: Pexels)

9 Year Old Girl Suffer Story: अलीकडेच समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणात एका ९ वर्षीय चिमुकलीला काखेतील दुखण्यामुळे तब्बल ६ दिवस त्रास सहन करावा लागल्याचे समजतेय. एका अगदी नेहमीसारख्या वाटणाऱ्या दिवशी ही ९ वर्षीय चिमुकली (ऍडलिन मॅकडोवेल) ही शाळेत गेली होती. दुपारच्या वेळी अचानक तिला एका काखेत वीज कडाडल्यासारख्या तीव्र वेदना जाणवू लागल्या असं ती सांगू लागली. सुरुवातीला ही एखादी ऍलर्जी असेल किंवा पजाम्याच्या टॅगमुळे चुरचुरत असेल असं तिला वाटलं पण हळूहळू वेदना प्रचंड वाढू लागल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया टुडेने सदर चिमुकलीची आई जेसिका कॅलविल्लो हिच्या हवाल्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. काहीच तासात या चिमुकलीला ताप आला हळूहळू तिच्या चेहऱ्याचा रंग सुद्धा हलका पिवळसर पांढरा पडू लागला, तिच्या ओठाचा रंग निळा-जांभळा होऊ लागला, यावेळी तिला इतक्या वेदना होत होत्या की ती अक्षरशः थरथरत होती. तिची प्रत्येक मिनिटाला बिघडणारी अवस्था पाहून जेसिका हिने थेट आपत्कालीन वैद्यकीय मदत विभागाला कॉल केला.

डॉक्टरांनी काय सांगितलं?

दुर्दैव म्हणजे यावेळी डॉक्टरांनी हा त्रास फार नसल्याचे सांगितले, विशेष म्हणजे जेसिकाला असा संशय होता की कदाचित ऍडलिनला कोळ्याच्या प्रजातीने चावल्याने अशा वेदना होत असाव्यात पण डॉक्टरांनी ही शक्यता सुद्धा फेटाळून लावली. एकीकडे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जेसिकाने अन्य डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेतला पण तिथेही तिची निराशाच झाली.

दुसरीकडे, ऍडलिनची प्रकृती रात्रभर बिघडतच होती, तीव्र वेदनांमुळे तिला झोप येत नव्हती. दुसर्‍या दिवशी सकाळी, तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुद्धा झाला होता, ज्यामुळे कुटुंबाची भीती आणखी वाढली होती. शेवटी पुन्हा जेसिका आपल्या लेकीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्यावर, डॉक्टरांनी अॅडलिनला एका तपकिरी कोळ्याने चावा घेतला आहे असं सांगितलं.

हेमोलाइटिक अॅनिमिया म्हणजे काय?

अखेरीस डॉक्टरांनी जेव्हा तिच्यावर उपचार सुरु केले तेव्हा तिला हेमोलाइटिक अॅनिमियामुळे रक्तस्त्राव झाला होता असेही निदान झाले. कोळ्याच्या चाव्यानंतर तिच्या लाल रक्तपेशी पूर्णपणे खराब झाल्या होत्या परिणामी ही स्थिती उद्भवली होती. निदानानंत, सूज कमी करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, तिचा हात ‘टेक्सास स्लिंग ‘मध्ये ठेवण्यात आला होता ज्यासाठी तीन दिवस तिचा हात डोक्यावर बांधून ठेवला होता.

हे ही वाचा<< Air India च्या क्रूमुळे प्रवाशाला सेकंड डिग्री बर्न! संतप्त पोस्ट चर्चेत, म्हणाल्या “दोन तास कळवळताना, ४ वर्षांचा मुलगा..”

दरम्यान, सध्या ऍडलिनच्या हातावर एक मोठा व्रण आहे पण सुदैवाने तिच्या जिद्द व हिमतीने तिने या त्रासावर मात केली आहे. सध्या ती सॉफ्टबॉल ऑल-स्टार संघातही खेळत आहे. अशा प्रकारच्या स्थितीतून जाणाऱ्या कुटुंबांना बळ देण्यासाठी जेसिकाने ही कहाणी शेअर केली आहे असे तिने टिकटॉकवर सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 9 year old girl feels shooting pain in armpits her lips turned purple mother finds out real reason will make your mind blown svs

First published on: 30-09-2023 at 12:52 IST
Next Story
बापरे! सोफ्यावर ठेवलेल्या बंदुकीला खेळणं समजत ३ वर्षांच्या चिमुकलीनं स्वत:वरच गोळी झाडली, धक्कादायक VIDEO व्हायरल