scorecardresearch

Premium

जिद्दीला सलाम! वयाच्या ९२व्या वर्षी शाळेत जाते ही आजी; समाजाला देतेय प्रेरणा, पाहा व्हिडीओ

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात राहणाऱ्या ९२ वर्षाच्या आजी ने शाळेत जाऊन सर्वांना चकीत केले आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्यात शिक्षण घेण्यासाठीची त्यांची जिद्द पाहून सर्वांना थक्क केले आहे.

92 year old grandmother who went to school and studied-is becoming an inspiration for the society
वयाच्या ९२व्या वर्षी शाळेत जाते ही आजी (फोटो सौजन्य – Salima khan, Twitter)

कित्येक लोक आपल्या चांगल्या विचारांमुळे समाजासाठी प्रेरणा ठरतात. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात राहणाऱ्या ९२ वर्षाच्या आजीने शाळेत जाऊन सर्वांना चकीत केले आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्यात शिक्षण घेण्यासाठीची त्यांची जिद्द पाहून सर्वांना थक्क केले आहे. या आजींचे नाव सलीमा खान आहे. सलीमा यांना सहा महिन्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि त्या पुढील शिक्षण घेण्यासाठी सक्षम आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलीमा यांना पाढे येतात. सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो व्हायरल होत आहे. लोकांना या आजी प्रेरणा देत आहेत.

हेही वाचा – धक्कादायक! लेकीच्या लग्नासाठी बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या १८ लाख रुपयांना लागली वाळवी, महिलेच्या पायाखालची जमीन सरकली

प्राथमिक विद्यालय चावलीच्या मुख्यध्यापिका डॉय प्रतिभा शर्मा सांगातात, ”८ महिन्यांपूर्वी सलीमा माझ्याकडे आल्या आणि शिक्षण घेण्यासाठी विनंती केली. वयस्कर लोकांना शिक्षण देणे ही एक जबाबदारी आहे पण त्यांची जिद्द पाहून त्यांना वर्गात बसण्याची परवानगी दिली. ”

love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
mill workers got houses
पात्र ५८५ गिरणी कामगार अखेर हक्काच्या घरात, कोन पवनेलमधील घरांचे वितरण
girl was sexually assaulted mumbai
मुंबई : चार वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक
PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”

सलीमा यांना लहानपणी काही कारणामुळे शिक्षण घेता आले नाही पण आपले शिक्षण पूर्ण करू इच्छित होत्या. त्यांनी माहिती देताना सांगितले की, नातवडं त्यांच्याकडून जास्त पैसे घेतात. ती शिकलेली नाही त्यामुळे त्यांना खूप अडचणी येत असे. अशा स्थितीमध्ये सलीमा यांनी वयाच्य ९२ व्या वर्षी आपले शिक्षण सुरू केले. केंद्र सराकार द्वारे साक्षर भारत अभिनयांनतर्गत रविवार १५ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या अशिक्षित लोकांची साक्षरता परिक्षा घेण्यात आली. दरम्यान, सलीमा खान यांनी परिक्षा हॉलमध्ये सर्वांचे लक्ष वेधले.

हेही वाचा – मांजरीचे पिल्लू समजून ब्लॅक पँथर घरी घेऊन आली महिला; चकीत करणारा व्हिडीओ एकदा पाहाच!

डॉ. प्रतिभा शर्मा यांच्यानुसार, वयस्कर सलीमाचा उत्साह पाहून त्यांच्या दोन सुनांसह गावाच्या २५ महिलांनी देखील साक्षर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. शिक्षणाबाबत त्यांचे विचार ऐकून लोक खूप खूश आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 92 year old grandmother who went to school and studied is becoming an inspiration for the society snk

First published on: 28-09-2023 at 09:31 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×