९२ वर्षांच्या आजोबांनी ८० वर्षांपासून कापले नाहीत केस; कारण जाणून थक्क व्हाल

९२ वर्षांच्या आजोबांनी ८० वर्षात वाढवले पाच मीटर केस

दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी मनुष्य गेली हजारो वर्ष प्रयत्न करत आहे. विज्ञानात प्रगती केली, नवनवीन औषधं शोधली, योगा, व्यायाम, पोषक आहार असे अनेक प्रयोग आजवर मानवाने केले आहेत. परंतु व्हिएतनाममधील एका आजोबांनी दिर्घ आयुष्य मिळवण्यासाठी एक नवीनच शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क आपले केस वाढवले आहेत.

व्हिएतनाममध्ये दक्षिण मेकॉन्ग डेल्टा या प्रांतात राहणाऱ्या एका ९२ वर्षांच्या आजोबांनी दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी चक्क केस वाढवले आहेत. या आजोबांचं नाव नगुऐन वॅन चिएन असं आहे. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी केस न कापण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या ८० वर्षांत त्यांनी एकदाही केस कापलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे केस आता जवळपास पाच मीटर लांब झाले आहेत.

गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केस न कापण्याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, “जर मी केस कापले तर माझा मृत्यू होईल असा माझा विश्वास आहे. मला काहीही बदलायचं नाही. मला दीर्घ आयुष्य जगायचं आहे. त्यामुळे मी केस धुवत नाही किंवा केस विंचरतही नाही. माझ्या दीर्घ आयुष्याचं रहस्य माझ्या केसात आहे.” वॅन आजोबांचे कुटुंबीय त्यांचे लांबलचक केस सांभाळायला त्यांना मदत करतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 92 year old vietnamese man never cut hair last 80 years mppg

ताज्या बातम्या