Premium

Video: संघर्ष कुणाला चुकलाय? ९५ वर्षीय आजोबा जगण्यासाठी या वयातही करत आहेत ‘हे’ काम

Viral video: संघर्ष कुणाला चुकलाय का? पण उतार वयातही या आजोबांचा संघर्ष पाहून तुमचेही डोळे पाणावतील

95 year old man plays drums at wedding video viral
९५ व्या वर्षीही आजोबांचा जगण्यासाठी संघर्ष

सोशल माध्यमांवर दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.रस्त्यावर एखादा तरुण माणूस भीक मागायला आला तर आपण त्याला म्हणतो की ’हट्टकट्टा तर आहेस, भीक का मागतोस? काम का नाही करत.’ आपला हा फुकटचा सल्ला ऐकून तो एकतर तोंड पाडतो किंवा आपल्यालाच गुर्मी दाखवतो. मात्र एक आजोबा वयाच्या ९५ व्या वर्षीही कष्ट करताना पाहायला मिळाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजोबा एका लग्न समारंभात ढोल वाजवताना दिसत आहेत. त्यांचे वय ९५ वर्षे आहे. या वयातही आजोबा पोटापाण्यासाठी कष्ट करून पैसे कमावतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते कधी सर्वांसमोर ढोल वाजवतात तर कधी थकून जमिनीवर बसतात. आपण आजूबाजूला धडधाकट लोक भीक मागताना पाहतो, तरुण मुलं नशेच्या आहारी गेलेली पाहतो. मात्र हे आजोबा अगदी आयुष्याच्या शेवटच्या काळातही स्वत:हा कमवून खात आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोटिवेशन मिळालं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – धावत्या बाईकवर पडला पत्रा, दुचाकीस्वाराचे क्षणात दोन तुकडे, Video पाहून उडेल थरकाप…

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १८ मिलियन व्ह्यूज गेले आहेत. अनेकजण यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही जण आजोबांचं कौतुक करत आहेत तर काही जणांनी त्यांच्या मुलांना जबाबदार ठरवलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 95 year old man plays drums at wedding emotional video viral on social media srk