Mumbai accident video viral: रोड सेफ्टी अर्थात् रस्ता सुरक्षा हा मुद्दा नेहमीच चर्चेचा मुख्य विषय राहिला आहे. जगभरात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. भारतातही दर वर्षी सुमारे दीड लाख व्यक्ती रस्ते अपघातात मरण पावतात. अल्पवयीन मुलांना ड्रायविंग पासून रोखण्यासासाठी सरकार आता कडक पावलं उचलत आहे. तरीही पालक मुलांकडे लक्ष देत नाहीत, असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मुंबईतील चांदिवली परिसरात एका १४ वर्षीय मुलाने आपल्या पालकांची गाडी चालवत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सदर अल्पवयीन मुलाचे गाडीवरील नियंत्रण सुटले असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोसायटीच्या गेटमधून गाडी बाहेर काढताना त्याच्याकडून गाडीवरील नियंत्रण सुटून गाडीचा वेग अचानकपणे वाढला आणि रस्त्यावरून जात असलेल्या वृद्ध व्यक्तीला चिरडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर पुढे गेल्यानंतरही रस्त्यावरून गाडी नागमोडी पद्धतीने आणि वेगाने पुढे जाताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सदर मुलाच्या पालकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात आली आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> VIDEO: चालत्या बाईकवर जोडप्याचा ‘रोमान्स’ व्हायरल, एकमेकांना KISS करत…बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा १८ वर्षांखालच्या मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, असा नियम आहे. तुमचं स्वत:चं मूल असेल तरीही अशी चूक करू नका. कारण, कायदे तयार करताना नातेसंबंधांचा नाही, तर वयाचा निकष विचारात घेतला जातो. म्हणून अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देऊ नका.