Premium

शंभर पंख्यांचा वापर करून साकारला गणपती बाप्पा, होर्डिंगवरील जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

या जाहिरातीमध्ये शंभर पंख्यांचा उपयोग करुन चक्क गणपती साकारला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. या जाहिरातीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

a advertisement of ceiling fans company
शंभर पंख्यांचा वापर करुन साकारला गणपती बाप्पा, होर्डिंगवरील जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल (Photo : Instagram)

Viral Video : एखादी वस्तू किंवा सेवांचे महत्त्व आणि माहिती देण्यासाठी जाहिरात ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. हल्ली नवनवीन जाहिराती पाहायला मिळतात. टीव्ही, वृत्तपत्रे किंवा मोठमोठ्या होर्डिंगवर आपण दररोज हजारो जाहिराती बघतो. काही जाहिराती इतक्या क्रिएटिव्ह असतात की पाहून कोणीही थक्क होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या देशभरात गणेशोत्सव सुरू आहे. याच निमित्ताने गणपती बाप्पांसंबंधित अनेक जाहिराती जागोजागी दिसून येत आहेत. अशाच एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या जाहिरातीमध्ये शंभर पंख्यांचा उपयोग करून चक्क गणपती साकारला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. या जाहिरातीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावरील एक होर्डिंग दिसेल. या होर्डिंगवर हॅवेल्स (havells) या सीलिंग फॅन कंपनीची जाहिरात लावली आहे. या कंपनीने क्रिएटिव्हिटी दाखवत शंभर पंख्यांचा वापर करून गणपती बाप्पा साकारला आहे. विशेष म्हणजे होर्डिंगवर हे शंभर पंखे फिरताना दिसत आहेत. या होर्डिंगचा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल. सध्या या जाहिरातीच्या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : पौष्टिक अडई डोसा खाल्ला का? ही सोपी रेसिपी लगेच नोट करा अन् घरीच झटपट बनवा

confused.aatma या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “मार्केटिंगसाठी चक्क देवाचा वापर केलाय” तर एका युजरने लिहिले, “क्रिएटिव्ह टीमला १०० टक्के बोनस मिळणार” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह.. याला म्हणतात जाहिरात”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A advertisement of ceiling fans company havells made ganpati bappa using 100 fans on hoarding video goes viral ndj

First published on: 25-09-2023 at 21:41 IST
Next Story
Video: तुफान राडा! आधी मारहाण, मग एकमेकांचे ओढले केस; मुंबई लोकलमध्ये महिलांची दे दणादण फायटिंग