Itaunja Tractor Stunt Driver Dies : मित्रांमध्ये अनेकदा विविध गोष्टींवरुन पैज लावली जाते. स्टंटबाजी असो वा वेगाने गाडी चालवणे, उंचावरुन उडी मारणे असो वा लांब अंतरापर्यंत पोहणे असो लोक कसलाही विचार न करता पैज स्वीकारण्यास घाबरत नाही, पण अशाने ते आपला जीव धोक्यात घालतात. काहीवेळा मित्र अशा काही पैज लावतात की, ज्यातून आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याचीही विचार केला जात नाही, अशाचप्रकारे लखनऊच्या इटौंजामध्ये दोन मित्रांनी १५ हजार रुपयांसाठी ट्रॅक्टर ओढण्याची पैज लावली, पण ही पैज पूर्ण करण्याच्या नादात एकाच अतिशय वेदनादायक पद्धतीने मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना 22 जून रोजी दुपारच्या वेळेस घडली. एका रिकाम्या शेतात दोन मित्रांमध्ये लागलेली ट्रॅक्टर ओढण्याची पैज पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. नीरज आणि जोगेंद्र नावाचे दोन मित्र आपापल्या ट्रॅक्टरमधून आले. त्यांच्यात १५ हजार रुपयांची पैज लागली होती. यावेळी दोघांनीही आपले ट्रॅक्टर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने उभे केले आणि दोन्ही ट्रॅक्टर लोखंडी साखळीने बांधले.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
girlfriend swept away by strong waves in russia sochi n front of boyfriend during romance video
समुद्राच्या उंच लाटांमध्ये उभे राहून रोमान्स; प्रियकराच्या डोळ्यांदेखत वाहून गेली प्रेयसी; धडकी भरविणारा VIDEO व्हायरल
Maharashtra: Man Rams Speeding Car Into Chiplun Hotel Over Delay In Getting Water Bottle; Video Viral
VIDEO: एका क्षणाचा राग सगळं उद्ध्वस्त करतो! चिपळूणमध्ये पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने पाहा तरुणाने काय केले…
Neet Exam
NEET Paper Leak : आरोपींकडे सापडलेल्या जळालेल्या प्रश्नपत्रिकेतून अनेक खुलासे, तब्बल ६८ जुळणारे प्रश्न अन्…
Pune People Are You Planning To Visit Tamhini Ghat This Weekend Wait First Watch This Video
ताम्हिणी घाटात बाईक घेऊन जाण्याआधी ‘हा’ VIDEO पाहा; रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांचं काय झालं बघाच
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

कोण विरुद्ध दिशेने असलेला ट्रॅ्क्टर ओढण्यात यशस्वी होईल, तो १५ हजार रुपये जिंकेल, अशी ही पैज होती. पैज सुरू होताच दोघांनीही ट्रॅक्टर चालवायला सुरुवात केली पण जोगेंद्रच्या ट्रॅक्टरने नीरजचा ट्रॅक्टर जोरात खेचला, त्यामुळे नीरजचा ट्रॅक्टर समोरच्या दिशेने वर उलटला. यावेळी ट्रॅक्टर नीरजच्या अंगावर उलटला आणि तो त्याखाली दबला गेला.

“एक १५० ची तर दुसरी २०० ची…” विदेशी महिलांविषयी तरुणाने केलेल्या ‘त्या’ विधानावरुन नेटीझन्स संतापले, VIDEO पाहून म्हणाले…

यानंतर लोकांनी आरडाओरडा करत जोगेंद्रला ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले आणि नीरजचा ट्रॅक्टर सरळ करण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरखाली नीरज अतिशय वाईटरित्या दबला गेला, ज्यामुळे त्याचे शरीर कोणताही हालचाल करेनासे झाले. गावकऱ्यांनी मिळून ट्रॅक्टर सरळ करून नीरजला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. लोकांचे म्हणणे आहे की, नीरजला ट्रॅक्टर स्टंटचा शौक होता आणि त्याने यापूर्वीही दोनदा अशीच पैज जिंकली होती. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या परिसरात अशाप्रकारे जीवघेणा स्टंट सुरू असल्याची कल्पना पोलिसांना नव्हती. याप्रकरणी पोलीस अधिकारी म्हणाले की, हे प्रकरणाची दखल घेत तपास केला जात आहे, या स्टंटबाजीसाठी पैज लावण्यात आणखी कोणत्या लोकांचा समावेश होता, त्या लोकांची ओळख पटवली जाईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.