Viral Video : निसर्गातील अनेक प्राणी छद्मावरणाच्या मार्गाने स्वत:चे रक्षण करतात. काही प्राणी छद्मावरणाच्या मार्गाने शिकार सुद्धा करतात. छद्मावरणला इंग्रजीमध्ये कॅमोफ्लाज सुद्धा म्हणतात. दिशाभूल करणे किंवा फसविणे हा छद्मावरणमागचा उद्गेश असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मगर छद्मावरण करताना दिसून आली. जंगलातील अनेक प्राणी छद्मावरण करण्यात उत्कृष्ठ असतात. अशात या मगरीची सुद्धा तुम्हाला हुशारी पाहायला मिळेल. जंगल सफारी करणाऱ्या कॅमेरामॅनच्या अंगावर कशी अचानक मगर धावून आली, हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a big crocodile hidden in mud attack on cameraman)

सोशल मीडियावर जे ब्रेवर अंगावर अनेक धक्कादायक व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांचा प्रत्येक व्हिडीओ थरकाप उडवणारा असतो. अशात जे ब्रेवरने असाच एक व्हिडीओ शेअर केला की पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडीओमध्ये चिखलाने माखलेला एक तलाव दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की अचानक या चिखलातून मगर बाहेर येते आणि डरकाळी फोडते. मगरीची डरकाळी पाहून कॅमेरामॅन सुद्धा घाबरतो आणि पळत सुटतो. मगर चिखलात लपलेली असते. चिखलामध्ये मगर छद्मावरण करत म्हणजेच शिकारीच्या उद्देशाने लपलेली होती. कॅमेरामॅन जे ब्रेवर दिसताच ती अंगावर धावून येते.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

a hen was looking on chicken pieces
VIDEO : मृत्यू जेव्हा समोर दिसतो! चिकनच्या तुकड्यांकडे टक लावून बघतेय कोंबडी, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सोडलं नॉनव्हेज
Man Sexually Assault Dogs
रस्त्यात श्वानांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावणाऱ्या विकृताचा Video व्हायरल; लहान मुलगी अत्याचार पाहून थांबवायला गेली पण..
Grandmother living childhood again!
“पुन्हा बालपण जगणारी आजी!” नातवंडाबरोबर खेळतेय लगोरी, Viral Video पाहून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Animal Attack Video
अवघ्या ३० सेकंदांत कोमोडो ड्रॅगनने हरणाला केलं फस्त; जंगलातील Video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
Children put their mouths a bottle cap shocking video
पालकांनो मुलांकडे लक्ष द्या; खेळताना तोंडात अडकलं झाकण, चिमुकला कळवत राहिला अन् VIDEO चा शेवट पाहून येईल अंगावर काटा
Seeing the fast running cheetah the rabbit also ran fast
‘जेव्हा मृत्यू जवळ येतो…’, वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या चित्त्याला पाहून ससाही सुसाट धावला; पण पुढच्या पाच सेकंदात जे घडलं VIDEO पाहून उडेल थरकाप
Husband and wife choked each other for a trivial reason
हद्दच झाली राव! क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीचा घराबाहेर राडा, एकमेकांना बेदम चोपलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांना आलं हसू

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : हीच खरी माणुसकी! भटक्या गायींना स्वतःच्या हाताने भरवली पोळी; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “तू कलियुगातला देव”

jayprehistoricpets या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही मोठी मगर अत्यंत हुशारीने लपलेली होती. चांगले आहे की मी रेकॉर्डिंग करत होतो. मगरीला माहिती नसते की कॅमेरामॅन नेहमी सुरक्षित राहतो. जर मी शूट करत नसतो तर मी सुरक्षित अंतरावर असतो.” जे ब्रेवर यांनी जंगलसफारी करताना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. अनेक लोकांनी कॅमेरामॅनला सावध राहण्याचा सल्ला दिला आहेत. एका युजरने लिहिलेय, “कॅमेरामॅन कधीच लपत नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “हे खूप भयानक होतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा अशा भयानक प्राण्यांपासून दूर राहा” एक युजर लिहितो, “तुम्ही कॅमरामॅन आहात, काळजी नसावी.