आकाशात दिसला मोठा साप? आश्चर्यचकित होऊन लोकांनी विचारले “हा एलियन तर नाही!”

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

sanke in sky
हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (फोटो: viralhog / Instagram )

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असे काही व्हिडीओ असतात जे मोहित करतात, तर काही विशेष व्हिडीओ असतात जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. असाच एक नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, साप आकाशात वायरच्या मध्यभागी अडकलेला दिसतो. हा साप खूप मोठा आणि लांब आहे. हा साप पाहून लोक घाबरले. हा साप आकाशात आहे यावर कोणाचाच विश्वास बसत नाही, पण हे सत्य आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की साप तारांच्या दरम्यान अडकला आहे. साप पाहून लोकांना आश्चर्य वाटते. साप इतका प्रचंड आहे की लोक भयंकर घाबरतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक लोक कमेंटही करत आहेत.

( हे ही वाचा: “भाई मारो मुझे मारो..” फेम मोमीन साकिबचा भारत- पाकिस्तान सामन्याआधी नवीन व्हिडीओ व्हायरल )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ व्हायरल हॉगच्या इन्स्टाग्राम चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर ३ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले आहे – शेवटी, तो वायरवर कसा आला, तो एलियन आहे की नाही. या व्हिडीओवर कमेंट करताना दुसर्‍या युजरने लिहिले – हे पूर्णपणे भीतीदायक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A big snake in the sky surprised people asked isnt this an alien ttg

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?