जलशक्ती मंत्रालयाने मेघालयातील नदीवर तरंगणाऱ्या बोटीचा अप्रतिम फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नदीचे पाणी इतके स्वच्छ आणि नितळ आहे की खालचे हिरवीगार झाडी आणि दगड स्पष्ट दिसतात. जणू बोट पाण्यावर तरंगण्याऐवजी हवेत उडत आहे. हे चित्र उमंगोट नदीचे आहे. नद्या स्वच्छ ठेवल्याबद्दल मंत्रालयाने राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत.

शिलाँगपासून उमंगोट नदी सुमारे १०० किमी अंतरावर आहे. जलशक्ती मंत्रालयाने सांगितले की, ही जगातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक आहे. आपल्या सर्व नद्या अशाच स्वच्छ असाव्यात असे मला वाटते. मेघालयच्या जनतेला सलाम. फोटोमध्ये बोटीत पाच जण दिसत आहेत.

( हे ही वाचा: अबब! माशाने गिळला १ मीटर लांबीचा साप; हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

मंत्रालयाने मंगळवारी ट्विटरवर हा फोटो शेअर केला. या पोस्टला जवळ जवळ ४ हजार रिट्विट्स आणि २० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एका व्यक्तीने कमेंट करत यमुना नदी अशी कधी होणार असा प्रश्न केला. तर दुसऱ्याने लिहिले की, अरुणाचल प्रदेशातील बहुतांश नद्या स्वच्छ आहेत.