Viral Video : तरुणाईमध्ये बॉडी बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे यासाठी ते जिममध्ये जातात. बॉडी बनवण्यासाठी खूप मेहनत घेतात. काही तरुण मुलं घरीसुद्धा व्यायाम करतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.बॉडी बनवण्यासाठी हा तरुण दरवाज्याच्या रॉडला लटकताना दिसत आहे पण पुढे या तरुणाबरोबर असं काही होतं की व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण घरी दरवाज्याच्या रॉडला लटकत व्यायाम करण्याचा प्रयत्न करत आहे पण तरुणाचे वजन जास्त असल्यामुळे तो अचानक दरवाज्याचा रॉड घेऊन धाडकन् खाली पडतो आणि त्याच्या पायाला मोठी दुखापत होते. बॉडी बनवण्याचा नाद त्याला महागात पडतो. हेही वाचा : तरुणाची गौतमी पाटीलला टक्कर! लावणीवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल houseforsocial या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, "जर व्यायाम करायचा असेल तर जिममध्ये जा घरी तोडफोड का करतोय?" तर एका युजरने लिहिलेय, "त्याला पायाला दुखापत झाली आहे" आणखी एका युजरने लिहिलेय, "बॉडी बनवण्याचा नाद बरा नव्हे!"