Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते वेगवेगळ्या गोष्टी, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. खऱ्या आयुष्यात त्याचे जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढेच त्याचे सोशल मीडियावरही फॅन फॉलोअर्स आहेत. त्यामुळेच त्याचा प्रत्येक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका ट्रकचे लग्नमंडपात रूपांतर करण्यात आले आहे. नक्की काय आहे हा प्रकार जाणून घेऊया..

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक ट्रक मॅरेज हॉल म्हणून दाखवण्यात आला आहे. बघायला गेलं तर हा एक ट्रक आहे पण पाहिल्यावर म्हणाल की चालते फिरते लग्नघर आहे. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये २०० लोक आरामात येऊ शकतात. लहान व्हिडिओद्वारे एक लहान फंक्शन क्लिप देखील दर्शविली जाते.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा

( हे ही वाचा: ‘रील’साठी सापाबरोबर पोज देणं साधुला पडलं महाग; हकनाक गमावला जीव)

कोणत्याही ठिकाणी विवाह हॉल बांधला जाईल

ट्रकमध्ये अशा प्रकारे फेरफार करण्यात आले आहेत की, तो आतून पाहिल्यावर त्याला लग्नमंडपाचे स्वरूप येते. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. आतमध्ये एसी आणि खुर्ची-टेबलही दिसतात. एकंदरीत ट्रक म्हणजे फिरते लग्नमंडप आहे. ही कल्पना पाहून आनंद महिंद्राही प्रभावित झाले आणि त्यांनी कार तयार करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे.

( हे ही वाचा: वनकर्मचाऱ्यांनी घडवून दिली हरवलेल्या हत्तीच्या पिल्लाची आईशी भेट; माता हत्तीने देखील दिला सोंडेने आशीर्वाद)

आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया

त्याने व्हिडिओला कॅप्शन दिले आणि लिहिले की मला त्या माणसाला भेटायचे आहे ज्याचे क्रिएटिव्ह मन या उत्पादनामागे आहे. हे उत्पादन केवळ दुर्गम भागातच सुविधा देणार नाही, तर पर्यावरणासाठीही ते सर्वोत्तम आहे. हे उत्पादन जास्त जागा देखील व्यापत नाही.