सध्याच्या काळात व्यवसाय करणं वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही. व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे इतरांपेक्षा आपल्या दुकानातील मालाची जास्त विक्री करण्यासाठी दुकानदारांना वेगवेगळे उपाय शोधावे लागत आहेत. काही दुकानदार ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या बाबतीत खूप हुशार असतात. असे लोक काहीही जुगाड करुन आपल्या दुकानातील मालाची विक्री करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते यासाठी वेगवेगळ्या आयडीया वापरतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते कधी स्पीकर्सचा वापर करतात, तर कधी ठिकठिकाणी पोस्टर आणि बॅनर लावून आपल्या दुकानाची जाहिरात करतात. पण सध्या एका लहान मुलाने त्याच्या मालाची विक्री करण्यासाठी अनोखा जुगाड केला आहे. जे पाहून अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत.

मुलाने आंबे विकण्यासाठी केला अनेखा जुगाड –

हेही वाचा- रोजंदारी करणारा मजूर एका रात्रीत १०० कोटींचा मालक बनला तरी कसा? आता मागे लागला पोलिसांचा ससेमिरा कारण…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मुलाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन देशी जुगाड केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय तो मुलगा ग्राहकांना आंबे घेण्यासाठी जे हावभाव करत होता, ते तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केले, ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुलगा एका साउथ इंडियन गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. नाचताना तो रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना हातवारे करत त्याच्या दुकानात येऊन आंबे विकत घ्या, असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओत मुलाने रस्त्याच्या कडेला लावलेली आंब्याची गाडीही दिसत आहे.

हेही पाहा- Video : शेतात रोपे लावण्यासाठी शेतकऱ्याचा अनोखा जुगाड; आता २ शेतकरी मिळून करतात १० जणांची कामे

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल –

मुलगा आंबे विकण्यासाठी डान्स करत असतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसत आहे. @KodaguConnect नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत तो १७ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर त्यावर अनेकांनी वगेवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कॅप्शनमध्ये मुलाबद्दल माहिती दिली आहे. वापरकर्त्याने लिहिले आहे, “म्हैसूर-मडिकेरी राष्ट्रीय महामार्गावरील येळावल येथे एका आंब्याच्या गाडीजवळ लहान मुलगा वाहनचालकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आंब्याच्या हंगामात अशा अनेक गाड्या या परिसरात रांगा लागतात.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A boy gambled to sell mangoes you will also appreciate watching the viral video jap
First published on: 26-05-2023 at 13:59 IST