scorecardresearch

सायकल दुचाकीला धडकून मुलगा रस्त्यावर पडला, तितक्यात मागून भरधाव वेगात बस आली; नंतर जे घडलं ते पाहून हैराण व्हाल

वेगाने सायकल पळवत रस्ता ओलांडताना दुचाकीला धडक देऊन मुलगा रस्त्यावर पडला

वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशी एक म्हण असून केरळमध्ये नुकताच त्याचा प्रत्यय आला आहे. वेगाने सायकल पळवत रस्ता क्रॉस करणाऱ्या मुलाने दुचाकीला धडक दिल्याचा एका व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर मुलगा सायकलसह रस्त्यावर पडतो. यावेळी मागून वेगाने बस धावत आल्यानंतरही मुलाला काही इजा होत नाही. सोशल मीडियावर या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

केरळमधील कन्नूरच्या तळीपरंबाज परिसरातील ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीत ही सर्व घटना कैद झाली आहे. रस्त्यावरुन वाहनं धावत असताना मुलगा बाहेरील रस्त्यावरुन वेगाने सायकलवरुन येतो आणि रस्त्यावरुन जाणारी वाहनं न पाहता रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी एका दुचाकीला सायकल धडकते आणि मुलगा सायकलसह खाली रस्त्यावर पडतो.

सायकल रस्त्यावरच थांबते आणि मुलगा रस्त्याशेजारी फेकला जातो. यावेळी मागून वेगाने येणारी बस त्या मुलाच्या सायकलवरुन जाते. यावेळी त्या सायकलचा चुराडा होतो. पण रस्त्याच्या शेजारी फेकला गेल्याने मुलगा सुदैवाने वाचतो. यानंतर मागून येणारी एक चारचाकी थांबते तर तिथे उपस्थित लोक मुलाकडे धाव घेतात. मुलगा उभा राहतो आणि हाताला खरचटलं असल्याने तिथे हात लावत पाहत उभा असतो.

सायकलची अवस्था पाहून अपघात किती भीषण ठरला असता याची कल्पना तुम्ही करु शकता. मुलगा इतक्या मोठ्या अपघातातून बचावल्याने नेटकरी आश्चर्य व्यक्त करत असून देव तारी त्याला कोण मारी असंही म्हणत आहेत.

पण अनेकजण मुलगा इतक्या वेगाने सायकल नेत असल्याने नाराजीदेखील जाहीर करत आहेत. कारण हा निष्काळजीपण त्याच्या जीवावर बेतला असता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A boy miraculously escaped accident after cycle hits bike in kerala sgy

ताज्या बातम्या