आईला जगातील सर्वात मोठी योद्धा म्हणतात. कारण आपल्या मुलांवरती कोणतंही आणि कितीही मोठं संकट आलं तरीही त्यांच्या रक्षणासाठी ती आपला जीव पणाला लावते. आईच्या प्रेमाच्या आणि समर्पणाच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. शिवाय आई ही आई असते मग ती प्राण्यांची असो वा माणसाची. कारण प्राणी देखील आपल्या मुलांवर जीपापाड प्रेम करतात आणि शेवटपर्यंत त्यांचे संरक्षण करतात. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालत मुलांचा जीव वाचवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका म्हशीने आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातल्याचं पाहायला मिळत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील थॉर्नीबश गेम रिझर्व्हमधील आहे. या व्हिडीओत झाडाखाली बसलेल्या सिंहाना म्हशींचा कळप दिसतो. यावेळी सिंह आणि म्हशींचा कळप यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यावेळी परिस्थिती चिघळणार असल्याचं लक्षात येताच एक म्हैस इतर म्हशींच्या आणि रेडकूला वाचवण्यासाठी सिंहाच्या कळपाला भिडताना दिसत आहे. यावेळी संतापलेला सिंहाचा कळप थेट म्हशीवर हल्ला करतात. या हल्ल्यात सुरुवातीला म्हैस तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण सर्व सिंहानी एकत्र हल्ला केल्यामुळे तिला त्यांच्या तावडीतून बाहेर पडणं अशक्य होतं. तरीही ती निर्भयपणे सिंहाच्या कळपाशी झुंज देताना दिसत आहे. पण यावेळी इतर म्हशी तिच्या मदतीला न आल्यामुळे अखेर तिचा दुर्देवी अंत झाल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

‘लेटेस्ट साइटिंग्ज’ या YouTube चॅनलने म्हशीच्या आणि सिंहाच्या कळपाच्या भांडणाचा थरारक व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “म्हैस आईने आपल्या बाळाला सिंहांपासून वाचवण्यासाठी स्वतःचा बळी दिला.” काही दिवसांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. शिवाय अनेकजण या व्हिडीओ प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी आपल्या बाळाला वाचवण्यासाठी जीव पणाला लावणाऱ्या शूर आईचे कौतुक केलं आहे, तसेच तिचा दुर्दैवी अंत झाल्याबद्दल ते दु:खही व्यक्त केलं आहे.

Story img Loader