Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा प्राणी असल्याने कुत्र्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही दररोज सोशल मीडियावर पाहत असाल कुत्र्याशिवाय गाय, बैल, घोडा, बकरी इत्यादी प्राण्यांचे सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये एक बैल रस्त्यात त्याच्या शिंगाने चक्क चार चाकी गाडी उचलताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चारचाकी गाडीमध्ये माणसं देखील बसलेली दिसत आहेत. व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. आजूबाजूचे लोक मदतीला धावताना दिसत आहे तर काही लोक घाबरून पळताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ एका रस्त्यावरील आहे. या रस्त्यावर एक काळ्या रंगाची चारगाडी उभी दिसत आहे. अचानक एक बैल तिथे धावत येतो आणि गाडीला त्याच्या डोक्याने आणि शिंगाने उचलण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे या गाडीत माणसं देखील बसलेली आहेत. ते सुद्धा घाबरताना दिसत आहे जेव्हा बैल गाडी उचलण्याचा प्रयत्न करताना दिसतो तेव्हा तेथील आजूबाजूचे लोक त्या बैलाला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात पण बैल थांबत नाही. शेवटी गाडी उचलता न आल्यामुळे बैल माघार घेतो आणि इथेच हा व्हिडिओ संपतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.
हेही वाचा : आई ही आई असते! बिबट्याचे पिल्लू एका विहिरीत पडले अन् मदतीसाठी आई करतेय लोकांजवळ विनवणी, Video Viral
पाहा व्हायरल व्हिडीओ
chrisbuilt92 या instagram अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर कॅप्शन मध्ये लिहिले, ” एसयुव्ही वर्सेस बुल म्हणजेच बैल” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” हे खूप चुकीचे घडले. मी आशा करतो की तेथील लोकांना कोणतीही इजा झाली नसावी.” तर एका युजरने लिहिलेय, “अशा बैलांना मोकाट सोडणे खूप चुकीचे आहे.” आणखी काही युजरने लिहिलेय, ” कॅमेरा मॅन नेमका कुठे आहे?” एक युजर लिहितो, ” बैलाची स्नायू खूप मजबूत आहे” या व्हिडिओवर काही युजर्सनी रोष व्यक्त केला आहे.