Viral Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येतात. सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही व्हायरल होणारे व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. भरधाव वेगाने दुचाकी चालवणारे अनेकदा रोडवर स्लीप होऊन अपघाताचे शिकार होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दुचाकी चालक थोडक्यात बचावला. कार चालकाने वेळीच ब्रेक मारल्यामुळे दुचाकीचालकाचे प्राण वाचले. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. (a car driver saved a bikers life bike driver said thanks by putting hands together)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक दुचाकी चालक भरधाव वेगाने दुचाकी चालवत आहे. अचानक त्याची दुचाकी घसरते आणि तो दुचाकीसह खाली पडतो. त्याच्यासमोरून एक कार रस्त्याने येते पण वेळीच कारचालकाने ब्रेक मारल्यामुळे दुचाकी चालक वाचतो अन्यथा तो कारच्या खाली आला असता. दुचाकी चालकाने हेल्मेट घातलेले असते त्यामुळे त्याला गंभीर दुखापत होत नाही आणि तो जागेवरून उठतो आणि हात जोडून कार चालकाचे आभार मानतो. कार चालकामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्ही आजवर रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल. हा तरुण थोडक्यात वाचला.

हेही वाचा : शेवटी काळजाचा तुकडा! लेकीबरोबर फोटो काढताना वडिलांचे डोळे आले भरून, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद, VIDEO पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : अधिकाऱ्याचे कारवरील नियंत्रण सुटले अन् सुसाट कारने एका महिलेसह दोन मुलींना उडवले, थरारक लाईव्ह अपघाताचा VIDEO समोर

_its.habil48 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” कारचालकाचे आणि प्राण वाचलवल्याबद्ल आभार व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला सलाम” तर एका युजरने लिहिलेय, “जर यमराजच्या जागी कोणी व्यक्ती प्राण वाचवत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा देव कोणीही नाही”
आणखी एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद दादा, दुचाकी चालकाचे प्राण वाचवल्याबद्दल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कारचालकाचे आभार मानले आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टच्या इमोजी शेअर करत कार चालकाचे कौतुक केले आहेत तर काही युजर्सनी दुचाकीचालकाचे सुद्धा आभार व्यक्त केल्याबद्ल कौतुक केले आहेत.