Viral Video: हल्ली एखादी नवीन गाणं प्रदर्शित झालं की, सोशल मीडियावर ते खूप चर्चेत येतं. त्या गाण्यांवर लोक लाखो रील्स, व्हिडीओ बनवतात. त्यातील काही रील्स खूप चर्चेतही येतात. नवनवीन गाण्यांवर रील्स बनवणाऱ्यांमध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा समावेश असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्यांपासून गुलाबी साडी हे गाणं खूप चर्चेत आहे; ज्यावर अनेकांनी रील्स बनवल्या आहेत. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर कोणती व्यक्ती डान्स करीत नसून चक्क एक मांजर या गाण्यावर नटलेली दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

कुत्रा असो किंवा मांजर या दोन्ही प्राण्यांना अनेक लोक जीव लावतात, त्यांना सांभाळतात. घरातील इतरांइतकेच त्यांना महत्त्व देतात. त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतात. काही जण तर या प्राण्यांना झोपण्यासाठी स्पेशल बेडदेखील आणतात. त्यांचे वाढदिवस साजरे करतात, तर कधी त्यांना त्यांच्या आवडीचे कार्टूनदेखील दाखवतात. हल्ली अनेक जण आपल्या प्राण्यांबरोबर रीलदेखील बनवताना दिसतात. आतादेखील एका व्यक्तीने मांजरीवर एक रील बनवली आहे, जी सध्या खूप चर्चेत आहे.

व्हिडीओमध्ये नक्की काय घडलं? (Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये गुलाबी साडी हे गाणं लावण्यात आलं असून यावेळी एका छोट्या मांजरीला तिची मालकीण सजवताना दिसत आहे. यावेळी मांजरीला सुरुवातीला ती टिकली लावते. त्यानंतर तिच्या गळ्यात कोल्हापुरी साज घालते आणि नंतर तिच्या नाकात नथ घालून तिच्या खांद्यावर गुलाबी रंगाची ओढणी ठेवते. यावेळी ती मांजरदेखील गोड एक्स्प्रेशन देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅ’प्शनमध्ये, ‘नखरेवाली’, असं लिहिलं आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @snehalll_kadam_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत नऊ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरनं लिहिलंय, “नखरेवाली माऊ.” दुसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “खूप सुंदर. अगदी एखाद्या मुलीसारखी दिसतेय.” तिसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “मराठी मुलगी.” आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, “ह्या पोरींनी पार वाट लावून टाकली मांजराची.”

हेही वाचा: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या श्वानाची जगण्यासाठी धडपड; वायनाड भूस्खलनानंतर काळीज पिळवटून टाकणारा जुना Video Viral

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीही गुलाबी साडी या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवल्या होत्या. या रील्स सोशल मीडियावरदेखील खूप व्हायरल झाल्या होत्या. त्यात आणखी एका मांजरीला अशा प्रकारेच सजवण्यात आलं होतं. एका महिलांच्या ग्रुपनंदेखील गुलाबी नऊवारी साडी नेसून, मराठमोळ्या पद्धतीनं डान्स केला होता. तसेच काही पुरुषांनी मॉर्निंग वॉकला गेल्यावर रील बनवली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A cats marathmola look on the song gulabi saree video goes viral on social media sap
Show comments