Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही.येथे दर दिवशी नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक अचंबित करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पाळीव चित्ता एका व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहे. तुम्ही आजवर कुत्रा, मांजर, बकरी, गाय या पाळीव प्राण्यांविषयी ऐकले असेल किंवा वाचले असेल पण चित्ता कसा काय पाळीव प्राणी असू शकतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पण हा व्हिडीओ भारतातील नसून पाकिस्तानातील आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी चांगलीच टिका केली आहे.

nouman.hassan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ नौमान हसननी शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,” चित्ताने हल्ला केला” नौमान हसन हा पाकिस्तानी असून त्याच्याकडे अनेक जंगली प्राण्यांचे कलेक्शन आहे. तो जंगली प्राणी पाळतो.

हेही वाचा : पाकिटमारांची दादागिरी, बसमधील प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, VIDEO पाहून व्हाल थक्क

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : तळ्याकाठी पाणी पीत होता हत्ती, पाण्यात लपलेल्या मगरीने अचानक केला हल्ला, जबड्यात पकडली सोंड अन्…थरारक Viral Video

नेमकं काय घडलं?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नौमानबरोबर एक चित्ता बसलेला दिसत आहे आणि चित्ताच्या शेजारी एक तरुण बसला आहे. हा तरुण चित्ताच्या डोक्यावरून हात फिरवतो मात्र चित्ताला ते आवडत नाही आणि तो तरुणावर हल्ला करतो आणि त्याच्यावर किंकाळतो. चित्ताचा हे रौद्र रुप पाहून तरण जागेवरून उठतो. नौमान चित्ताला शांत करण्यासाठी त्याच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसतो. विशेष म्हणजे हे पाहून नौमानला हसू आवरत नाही. हा व्हिडीओ पाहून तु्मच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप सुद्धा व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “हा जंगली प्राणी आहे, पाळीव नाही. त्यामुळे प्राण्यांचा आदर करा” तर एका युजरने लिहिलेय, “तरुण हूशार होता म्हणून जागेवरून लवकर उठला.” आणखी एका युजरने लिहिलेय, “चित्ताचा मूड चांगला नव्हता.”