Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुले त्यांची क्रिएटिव्हीटी दाखवत अनेक भन्नाट गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला दोन अंडी हातात घेऊन सुंदर कविता म्हणताना दिसत आहे. त्याची ही भन्नाट कविता तुम्हालाही आवडेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला निवांत घरी खिडकीशेजारी बसला आहे. त्याच्या हातात दोन अंडी आहेत आणि ही अंडी हातात घेऊन तो कविता म्हणताना दिसतो. चिमुकला कविता म्हणतो,
“दोन होती अंडी…
दोन होती अंडी…
त्यांना वाजली थंडी….
त्यांना वाजली थंडी…
दात लागले वाजायला….
अंडी लागली नाचायला…
नाचता नाचता टक्कर झाली
दोन अंडी फुटून गेली…
आईने केले ऑम्लेट मस्त..
आम्ही मुलांनी केले फस्त..”

चिमुकल्याची ही कविता ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या मुलांना हा व्हिडीओ दाखवावा, असे वाटू शकते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेेही वाचा : जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींना सेल्फी Video मध्ये घेऊन म्हटलेल्या एका वाक्यात ‘ही’ एक गोष्ट झाली स्पष्ट! मीमकऱ्यांनो पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेेही वाचा : ‘दिल संभल जा जरा…’ गाण्याचं आप्पांनी गायलं देसी व्हर्जन; ढोलकीची थाप अन् भन्नाट ताल; VIDEO पाहून धराल ठेका

little.man.advay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दोन होती अंडी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अद्वयदादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात. माझी मुलगी 1 वर्षाची आहे.तिला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. तुझा आवाज ऐकला की ती लगेच मोबाईल कडे धाव घेती. रडत असेल आणि तिला म्हणालो ना अद्वय दादा लावू लगेच शांत होते. माझ्या मुलीचं नाव श्रीशा आहे तू प्लीज तिच्यासाठी एखादा व्हिडिओ बनवशील का ज्यात तू तीच नाव घेशील. तिला खूप छान वाटेल. श्रिशा ताई म्हणाले की तिला आवडतं. तिच्या साठीचा व्हिडिओ अकाउंटला न टाकता मला पाठवला तरी चालेल.” तर एका युजरने लिहिलेय, “किती क्युट बोलतो हा बाळ आणि रेसिपी ही किती छान छान करून दाखवतो.. खूप छान वाटतं पाहायला..” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला असून त्यांनी इमोजी शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी या चिमुकल्याने इडलीवर सुंदर कविता केली होती. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या चिमुकल्याचे नाव अद्वय आहे आणि असेच रेसिपी आणि पदार्थांना घेऊन कविता सादर करतो. अवघ्या चार वर्षांचा अद्वयला हजारो लोक फॉलो करतात आणि त्याच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव करतात.