Premium

“तुला लाडू आवडतो?” चिमुकलीने थेट बाप्पाला विचारला प्रश्न; पाहा गोंडस व्हिडीओ

घरी हाताने बनविलेल्या अशाच एका गणपतीबरोबर एक चिमुकली गोड संवाद साधतानाचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चिमुकली बाप्पाबरोबर मनमोकळेपणाने बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

cute video goes viral ganeshotsav
"तुला लाडू आवडतो?" चिमुकलीने थेट बाप्पाला विचारला प्रश्न (Photo : Instagram)

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर गणपतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही लोकं घरीच गणपती हाताने साकारत आहे. घरी हाताने बनविलेल्या अशाच एका गणपतीबरोबर एक चिमुकली गोड संवाद साधतानाचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चिमुकली बाप्पाबरोबर मनमोकळेपणाने बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही चिमुकली बाप्पाच्या मुर्तीसमोर बसलेली आहे. गणपती बाप्पाची मुर्ती घरीच हाताने साकारलेली दिसत आहे. मुर्तीचे रंगकामसुद्धा अर्धवट बाकी आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकली गणपती बाप्पाच्या मुर्तीकडे बघून विचारते, “”तुला लाडू आवडतो? लाडू? देऊ का?” पुढे ही चिमुकली गणपतीला बोलण्याचा आग्रह करताना म्हणते, “गुरू ब्रम्हा बोल.. गुरू ब्रम्हा बोल आधी”
व्हिडीओ तुम्हाला दिसेल की पुढे ती मुर्तीच्या पाया पडते आणि बाप्पाला बरंच काही मागते. ती म्हणते, “बाप्पा सुखी ठेव, बुद्धी दे…मोठ्ठ कर..” चिमुकलीचा हा गोंडस व्हिडीओ पाहून कोणीही भारावून जाईन,

हेही वाचा : VIDEO : गणेशोत्सवादरम्यान काढा एकापेक्षा एक भारी गणपतीच्या रांगोळ्या, एकदा व्हिडीओ पाहाच..

babyviha30 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “निरागस प्रेम” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “सुखी ठेव बाप्पा या चिमुकलीला… सदैव तिच्या पाठीशी रहा….” आणखी एका युजरने लिहिलेय, “लवकर मोठी नको होऊ.. तु अशीच छान आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A child girl ask ganpati bappa for eating ladoo cute video goes viral ganeshotsav ganesh festival ndj

First published on: 18-09-2023 at 19:08 IST
Next Story
”ती स्त्री आहे…’, बंगळुरुमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेने वेळेचा केला सदुपयोग; कारमध्ये बसूनच सोलले वाटाने, फोटो होतोय व्हायरल