Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक गोंडस व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरुन हसायला येते तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका चिमुकलीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ही चिमुकली खुप सुंदर डान्स करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चिमुकली एका गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की डान्स करताना ती सुंदर हावभाव सुद्धा करत आहे. तिचे चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. इतक्या कमी वयात इतके सुंदर हावभाव करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ खूप जुना आहे जो आता पुन्हा व्हायरल झाला आहे. हेही वाचा : Nalinee Mumbaikar : १२ व्या वर्षी अंगावर स्वयंपाकाची जबाबदारी आली आणि…. zindagi_ek_kahaani या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "बापरे! इतका सुंदर अभिनय" तर एका युजरने लिहिलेय, "किती सुंदर हावभाव" आणखी एका युजरने लिहिलेय, "चिमुकली किती गोड आहे."