Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेक पालक त्यांच्या मुलांचे व्हिडीओ आवडीने सोशल मीडियावर शेअर करतात. कधी हे मुले हसताना दिसतात तर कधी रडताना दिसतात. कधी डान्स करताना दिसतात तर कधी गाणी म्हणताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला रडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला या चिमुकल्याची दया येईल पण हा चिमुकला खरोखर रडत नाही तर रडण्याची अॅक्टिंग करतोय. तुम्हाला सुरुवातीला विश्वास बसणार नाही पण हे खरंय. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला दिसेल की एक चिमुकला सुरुवातीला सांगतो की तो एक अभिनय करणार आहे. आई बाबा मला मोबाइल देत नाही आणि मी रडत आहे. मी हे करून दाखवतो आणि अचानक जोरजोराने रडायला सुरुवात करतो. त्याचे रडणे पाहून कोणीही अवाक् होईल. सुरुवातीला तो रडत रडत आई बाबाला फोन मागतो आणि त्यानंतर तो उद्या शाळेत जाणार नाही, असे म्हणतो आणि पुन्हा रडतो. या चिमुकल्याची अॅक्टिंग पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हेही वाचा : “सरकारला लाज वाटली पाहिजे”, चक्क ॲल्युमिनिअमच्या भांड्यात बसून आजारी वयोवृद्ध महिलेने पार केला ओढा; VIDEO पाहून नेटकरी संतप्त, म्हणाले… पाहा व्हायरल व्हिडीओ avi.rashi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "मित्रांनो, रुद्रांक्ष हा एक कलाकार आहे आणि तो खरंच अभिनय करतो. त्यामुळे कोणीही गंभीर होणार नाही. रुद्रांक्ष खूप चांगला अभिनेता आहे. मी आशा करतो की हा व्हिडीओ @netflix_in @amazonminitv @ektarkapoor @bhansaliproductions @colorstv @starplus @kapilsharma @bharti.laughterqueen इत्यादी लोकांजवळ पोहचेल. हेही वाचा : “घाईत घेतलेला निर्णय पश्चाताप करायलाही वेळ देत नाही” १८ सेकंदचा VIDEO पाहून अंगावर काटा येईल; चंद्रपुरात नक्की काय घडलं? या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "खूप वाढीव मुलगा आहे" तर एका युजरने लिहिलेय, "याला ऑस्कर अवार्ड मिळाला पाहिजे." आणखी एका युजरने लिहिलेय, "हा अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान यांचा बाप आहे अभिनयात" अनेक युजर्सनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहेत.