Viral Video : बहीण भावाचे नाते हे अनोखे आणि जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा सर्वच दिसून येतो. सोशल मीडियावर बहिण भावाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात.सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बहीण भाऊ तुफान दंगामस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या बहीण भावांची आठवण येऊ शकते.

हा व्हायरल व्हिडीओ एका घरातील आहे. या व्हिडीओत झोपण्यासाठी बेड अंथरलेला दिसत आहे. या बेडसमोर चिमुकले बहीण भाऊ मस्ती करताना दिसताहेत. ते उड्या मारताहेत. एवढचं काय तर मस्ती करताना एकमेकांच्या अंगावर पडताना सुद्धा दिसताहेत. या बहिण भावाचा दंगा पाहून तुम्हाला तुमचे बालपण आठवू शकते.

हेही वाचा : लपंडाव खेळताना बहिणीला शोधण्यासाठी भावाने लढवली अनोखी युक्ती, मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

biologicalmom या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ या चिमुकल्यांच्या आईने शेअर केला आहे. या अकाउंटवरुन ती तिच्या मुलांचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसणयाचे आणि हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
एका युजरने लिहिलेय, “किती ऊर्जा आहे या मुलांमध्ये” तर एका युजरने लिहिलेय, “किती गोंडस मुले आहेत.” काही युजर्सना या चिमुकल्यांचा नाईट सूट आवडला.

Story img Loader