Viral Video : सोशल मीडियावर काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सोशल मीडियावर स्टंटचे असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण डबल सीट त्याच्या मागे बसलेल्या गर्लफ्रेंडसह स्टंट करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. त्यांचा दुचाकीवरील स्टंट पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (a couple stunt video viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक तरुण दुचाकी चालवत आहे आणि त्याच्या मागे त्याची गर्लफ्रेंड बसली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुण अचानक जागेवरून उठतो आणि स्टंट करताना दिसतो. तो दुचाकीचे पहिले चार हवेत चालवतो आणि फक्त दुचाकीच्या मागच्या चाकेवर दुचाकी अत्यंत वेगाने चालवताना दिसतो. त्याच्या मागे बसलेली तरुणी एका हाताने त्याला पकडते. हा स्टंट पाहून कोणीही अवाक् होईल. भर रस्त्यावर हा तरुण हा भयानक स्टंट करताना दिसत आहे. जीव धोक्यात टाकून असा स्टंट करणारा हा तरुण स्वत:सह त्याच्या गर्लफ्रेंडचाही जीवाशी खेळत आहे.

हेही वाचा : Optical Illussion : कोणती इमारत पुढे अन् कोणती इमारत मागे आहे? पहिली की दुसरी; एकदा नीट क्लिक करून पाहा

आजवर तुम्ही असे अनेक स्टंट पाहिले असेल पण ते स्टंट करताना बाइकवर एकच व्यक्ती तुम्ही पाहिली असेल पण या व्हिडीओमध्ये बाइकवर या तरुणाची गर्लफ्रेंड सुद्धा बसलेली आहे. जोडप्याचा हा स्टंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या शहरातला आहे, याविषयी अद्याप माहिती नाही.

पाहा व्हायरल व्हिडीओ, येथे क्लिक करा

हेही वाचा : आमरस ठरला जगात अव्वल! गोड-रसाळ आंब्यापासून बनवलेला जगातील सर्वोत्तम पदार्थ, आंब्याच्या चटणीनेही मिळवले यादीत स्थान

itx_toxic_sa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या तरुणावर जोरदार टिका केली आहे काही लोकांनी या तरुणाला खडे बोल सुनावले आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा तु स्वत: पडशील आणि तिलाही पाडणार” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात जगायचं बरोबर आणि मरायचं बरोबर” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुलीचा किती विश्वास आहे मुलीवर..”